What is PDF In Marathi | पीडीएफ म्हणजे काय?

नमस्कार मित्रांनो, तुम्ही अनेकदा PDF File बद्दल ऐकलं असेल. बऱ्याचवेळा जेव्हा तुम्ही नोकरी साठी अर्ज करता तेव्हा आपला Bio-data / curriculum vitae (CV) हा PDF File फॉरमॅट मध्ये मागवला जातो. तसेच कोणत्याही व्यवसायात PDF File मध्येच प्रॉडक्ट्स ची माहिती पुरवली जाते. तर म्हणूनच What is PDF In Marathi हा अतिशय महत्वाचा विषय आपण आज अभ्यासणार आहोत.

पीडीएफ चा इतिहास काय तसेच पीडीएफ चा फुल फॉर्म काय ? आणि जर तुम्हाला पीडीएफ फाईल वाचायची असेल किंवा बनवायची असेल तर ते तुम्ही कसे कराल ? ह्या सर्व गोष्टी आपण आज सविस्तरपणे बघणार आहोत.

PDF Information In Marathi | पीडीएफ माहिती मराठीतून

Portable Document Format (PDF) हा एक फाईल फॉरमॅट आहे. ज्यामध्ये डिजिटल स्वरूपात कोणतीही माहिती (टेक्स्ट डाटा ), चित्रे (इमेजेस ) इत्यादी साठवले जातात.आजच्या डिजिटल युगात PDF फाइल्स अगदी सहजपणे शेअर केले जाऊ शकतात. तसेच तुम्ही ते Pen Drive मध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता.PDF Files ह्या सहज ओळखता येतात. ज्या फाइल्स च्या शेवटी .pdf हे extension असते ती PDF file असते.तसेच जर तुम्हाला PDF File गुप्त ठेवायची असल्यास तुम्ही पासवर्ड वापरून ती सुरक्षित ठेऊ शकता.

History of PDF In Marathi | पीडीएफ चा इतिहास

१९९१ मध्ये Adobe Systems चे सह-संस्थापक डॉ. जॉन वॉर्नोक यांनी कागदापासून डिजिटल क्रांतीची सुरुवात केली, ज्याला त्यांनी कॅमेलॉट प्रोजेक्ट (Camelot Project) म्हटले.

१९९३ मध्ये Adobe Systems ने पीडीएफ तपशील विनामूल्य उपलब्ध केले. तेव्हापासून PDF लोकप्रिय झाले.

PDF Full Form In Marathi | पीडीएफ चा फुल फॉर्म ?

PDF : Portable Document Format (PDF) = पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट = वाहक स्वरूपाचे दस्तावेज

How to read PDF Files In Marathi | पीडीएफ फाईल कशी वाचावी ?

जर आपण संगणक वापरत असाल तर तुम्ही adobe च्या official website वरून Adobe Acrobat Reader नावाचे सॉफ्टवेअर डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा. त्यानंतर .pdf extension असलेली PDF फाईल तुम्ही सहज तुमच्या संगणकावर उघडू शकता.

जर तुम्हाला मोबाईलमध्ये PDF उघडायची आहे तर तुम्ही Google Play Store अँप्लिकेशन वर जाऊन संबंधित Adobe Reader Application डाउनलोड करू शकता.त्यानंतर ते Application इन्स्टॉल करून कोणतीही PDF फाईल उघडू शकता.

How to make PDF File In Marathi | पीडीएफ फाईल कशी बनवावी?

जर आपणास PDF फाईल बनवायची असेल तर Google Play Store वर जाऊन तुम्ही संबंधित application download करून इन्स्टॉल करू शकता. तसेच जर तुमच्या कडे इंटरनेट connection असेल तर ऑनलाईन देखील टूल्स उपलब्ध आहेत.ते वापरून सुद्धा तुम्ही PDF File बनवू शकता.

पीडीएफ चा फुल फॉर्म ?

PDF : Portable Document Format (PDF) = पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट = वाहक स्वरूपाचे दस्तावेज

Leave a Comment