ब्लॉगिंग म्हणजे काय ? | What is Blogging in Marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण ब्लॉगिंग विषयी माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, आजच्या काळात इंटरनेट वरून ऑनलाईन पैसे ( Online earning ) कमावण्याचा एक सोपा मार्ग आहे आणि तो म्हणजे ब्लॉगिंग.त्यामुळेच , ब्लॉगिंग म्हणजे काय ( What is blogging in marathi ) हे आपण समजून घेतले पाहिजे. हेच समजून घेण्यासाठी मी हा लेख लिहीत आहे. चला तर मग सुरु करूयात.

मित्रांनो, ब्लॉगिंग ही एक अशी गोष्ट आहे जी कोणीही करू शकते. फक्त तुम्हाला एखाद्या गोष्टी विषयी माहिती पाहिजे आणि ती तुम्हाला योग्य रीतीने लिहिता आली पाहिजे. या लेखात आपण ब्लॉगिंग म्हणजे काय ? ( What is blogging in marathi ), ब्लॉग कसा तयार करावा ?( How to create a blog in marathi ), ब्लॉगिंग चे प्रकार कोणते ? ( Types of blogging in marathi ),ब्लॉग मधून पैसे कसे कमवायचे ? ( How to earn from blogging in marathi ) आणि ब्लॉगिंग चे फायदे कोणते ? ( What are the advantages of blogging in marathi ) हे सविस्तरपणे पाहणार आहोत.

What is Blogging in Marathi
What is Blogging in Marathi

ब्लॉगिंग म्हणजे काय ? | What is blogging in marathi

मित्रांनो , ब्लॉगिंग म्हणजेच अनेक ब्लॉग ची मिळून तयार झालेली वेबसाईट. अर्थात, सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तुम्ही आता वाचत आहात तो आहे माझा ब्लॉग आणि अशा अनेक ब्लॉग मिळून तयार झाली ती म्हणजे माझी वेबसाईट.

ब्लॉगिंग च्या माध्यमातून आपण लोकांच्या समस्या निवारण करू शकतो आणि त्यांना ज्या गोष्टी माहित नाही त्या बद्दल माहिती देऊ शकतो. जसे की तुम्हाला ब्लॉगिंग म्हणजे काय (What is blogging ) हे जाणून घ्यायचे आहे म्हणून तुम्ही माझा ब्लॉग वाचत आहात.

ब्लॉग कसा तयार करावा ? | How to create a blog in marathi

मित्रांनो, जर तुम्हाला ब्लॉग लिहायचा असेल तर तुम्ही तो दोन प्रकारे लिहू शकता. एक म्हणजे ब्लॉगस्पॉट (BlogSpot) आणि दुसरा म्हणजे वर्डप्रेस (WordPress ).

जर तुमच्याकडे ब्लॉग सुरु करण्याआधी थोडे भांडवल उपलब्ध असेल तर मी तुम्हाला सुचवेन कि तुम्ही वर्डप्रेस (WordPress ) या पर्यायाचा विचार करा. कारण, ब्लॉगस्पॉट (BlogSpot) च्या तुलनेत वर्डप्रेस मध्ये अनेक चांगले features आहेत.

परंतु, जर तुम्हाला ब्लॉग हा मोफत सुरु करायचा असेल तर तुम्ही गुगल ब्लॉगस्पॉट ( Google Blogspot ) बद्दल विचार करू शकता. मित्रांनो, तुम्ही ब्लॉगस्पॉट च्या मदतीने मोफत ब्लॉग तयार करू शकता आणि तो गुगल वर होस्ट सुद्धा करू शकता. परंतु , जर तुम्ही मोफत ब्लॉग सुरु करायचा विचार करत असाल,तर मी तुम्हाला सांगेन तुम्ही डोमेन नाव ( Domain name ) घेऊन काम करा.अर्थात, जेव्हा तुम्ही तुमचा ब्लॉग मोफत सुरू करता तेव्हा तुमच्या वेबसाईट नावापुढे गुगल blogspot.com हे नाव जोडतो ते नको असल्यास तुम्ही स्वतःच डोमेन घेऊ शकता.

ब्लॉगिंग चे प्रकार कोणते ? | Types of blogging in marathi

मित्रांनो, खाली दिलेल्या यादीत मी तुम्हाला ब्लॉगिंग चे ८ लोकप्रिय प्रकार सांगितले आहेत.

 • वैयक्तिक ब्लॉग्स । Personal Blogs
 • बिजनेस ब्लॉग्स । Business Blogs
 • प्रोफेशनल ब्लॉग्स । Professional Blogs
 • फॅशन ब्लॉग्स । Fashion Blogs
 • लाईफस्टाईल ब्लॉग्स । Lifestyle Blogs
 • ट्रॅव्हल ब्लॉग्स । Travel Blogs
 • अफिलिएट ब्लॉग्स । Affiliate Blogs
 • फूड ब्लॉग्स । Food Blogs

याशिवाय, जर तुम्हाला एखाद्या लहान गोष्टींविषयी माहिती असेल तर अशा विषयावर सुद्धा तुम्ही ब्लॉग बनवू शकता.या विषयां व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी कसले ज्ञान असेल तर ते सुद्धा तुम्ही ब्लॉग च्या स्वरूपात लोकांपर्यंत पोहचवू शकतात.

वैयक्तिक ब्लॉग्स । Personal Blogs In Marathi

या ब्लॉग्स मध्ये तुम्ही तुमचे स्वतःचे विचार मांडू शकतात. थोडक्यात सांगायचे झाले तर पूर्वी लोक रोजनिशी लिहायचे तसेच काही आज लोक स्वतः ला काय वाटतं ते लिहितात.

अशा प्रकारचे ब्लॉग्स अजूनही काही bloggers लिहितात. जेव्हा फक्त तुम्हाला तुमचे विचार मांडायचे असतात ते तुम्ही अशा ब्लॉग द्वारे मांडू शकतात.

बिजनेस ब्लॉग्स । Business Blogs

जर तुमचा व्यवसाय असेल आणि तुम्हाला ग्राहकांशी संवाद साधायचा असेल तसेच ग्राहकांचा समुदाय करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे ब्लॉग्स लिहू शकता. असे ब्लॉग्स तुमच्या व्यवसायाकरिता खूप उपयुक्त ठरतात.

प्रोफेशनल ब्लॉग्स । Professional Blogs

अशा प्रकारचे ब्लॉग्स हे पैसे कमवण्याच्या उद्देशाने लिहिले जातात. अशा प्रकारचे ब्लॉगर्स हे फ्रीलान्सर्स असतात जे पैसे कमवण्याच्या हेतूने ब्लॉग्स लिहितात.

फॅशन ब्लॉग्स । Fashion Blogs

फॅशन या विषयावर ब्लॉग लिहिणे हे तुमच्यासाठी खूप चांगले ठरू शकते. जर फॅशन या विषयी तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला वाटते कि ते तुम्ही लोकांपर्यंत योग्य रीतीने पोहचवू शकतात तर हा विषय खूप उपयुक्त आहे.या ब्लॉग्स मध्ये स्पर्धा सुद्धा जास्त आहे. तेव्हा असे ब्लॉग्स लिहिताना योग्य SEO जरूर करा.

लाईफस्टाईल ब्लॉग्स । Lifestyle Blogs

फॅशन ब्लॉग प्रमाणेच लाईफस्टाईल ब्लॉग सुद्धा खूप लोकप्रिय आहे. अशा ब्लॉग्स मध्ये तुम्ही निरोगीपणा, वर्कआउट तसेच पोषण या विविध विषयांचा समावेश करू शकता.

ट्रॅव्हल ब्लॉग्स । Travel Blogs

जर भटकंती करणे तुमची आवड आहे तर याच आवडीतून तुम्ही पैसे कमाऊ शकता. तुम्ही ट्रॅव्हल ब्लॉग्स बनवू शकता.

जर लोकांना फिरायला जायचे असेल तर ते आधी इंटरनेट वर सर्च करून त्या भागाविषयी माहिती गोळा करतात आणि मग ठरवतात कि त्या ठिकाणी भेट द्यायची कि नाही ते. जर अशा ठिकाणांविषयी तुम्ही आधीच लिहून ठेवले असाल तर असे लोक तुमचा ब्लॉग वाचू शकतात आणि माहिती मिळवू शकतात.

अफिलिएट ब्लॉग्स । Affiliate Blogs

मित्रांनो, अशा प्रकारचे ब्लॉग्स हे एखाद्या वस्तू किंवा सेवा विकून कमिशन मिळवण्यासाठी लिहिले जातात. जर तुमच्याकडे याचे थोडे फार ज्ञान असेल तर तुम्ही अशा प्रकारची ब्लॉगिंग करू शकता.जर तुम्हाला अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय ते जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करा.

फूड ब्लॉग्स । Food Blogs

फूड ब्लॉग हा सुद्धा लोकप्रिय ब्लॉग्ज मध्ये गणला जातो . मित्रांनो, जर तुम्हाला जेवण कसे असावे किंवा कसे बनवावे याची माहिती असेल तसेच जर तुम्हाला उत्तम डिशेस तयार करता येत असतील तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे.

मित्रांनो , अशाप्रकारे ब्लॉग्स चे अजून अनेक प्रकार पडतात त्यापैकी महत्वाचे ब्लॉग प्रकार मी वर दिले आहेत.

ब्लॉगिंग चे फायदे कोणते ? | What are the advantages of blogging in marathi

मित्रांनो, जर तुम्हाला ब्लॉगिंग चे फायदे कोणते ते पाहायचे असतील तर ते तुम्ही खाली दिलेल्या यादी मध्ये पाहू शकता. मी तुम्हाला काही मोजकेच फायदे सांगितले आहेत परंतु याही पेक्षा जास्त फायदे तुम्हाला होऊ शकतात.

 • सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे तुम्ही पैसे कमाऊ शकतात.
 • तुमचे ज्ञान वाढते.
 • तुमची लिहिण्याची पद्धत सुधारते.
 • तुम्ही तुमचा ग्रुप तयार करू शकता.
 • तुम्ही प्रसिद्ध होऊ शकतात.

ब्लॉग मधून पैसे कसे कमवायचे ? | How to earn from blogging in marathi

मित्रांनो, जर तुम्हाला ब्लॉगिंग या माध्यमातून पैसे कमवायचे असतील तर ते तुम्ही खाली दिलेल्या मार्गाने कमाऊ शकता.

 • गुगल ऍडसेन्स ( Google Adsense )
 • अफिलिएट मार्केटिंग ( Affiliate Marketing )
 • ब्रँड प्रमोशन (Brand Promotion )
 • गेस्ट पोस्ट (Guest Post )
 • बॅकलिंक (Backlink )

अशा अनेक प्रकारे तुम्ही ब्लॉगिंग मधून पैसे कमाऊ शकतात. तसेच, जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही कन्टेन्ट रायटर ( Content Writer ) हायर करून तुमचे ब्लॉग्स चालवू शकतात. मोबदल्यात, तुम्हाला तुमच्या प्रॉफिट मधले पैसे त्या व्यक्तीला द्यावे लागतील परंतु थोडा का असेना तुम्ही प्रॉफिट कमाऊ शकता.

मित्रांनो, अशाप्रकारे तुम्ही ब्लॉग्स लिहू शकता आणि ब्लॉग्स च्या माध्यमातून पैसे सुद्धा कमाऊ शकतात.

Leave a Comment