विरामचिन्हे व त्याचे प्रकार

जर तुम्ही MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी विरामचिन्हे व त्याचे प्रकार( Punctuation in Marathi) कोणते हा लेख अत्यंत महत्वाचा आहे.

विरामचिन्हे म्हणजे काय ? 

आपण विरामचिन्हे याचा अर्थ पाहिला तर वाक्यात एखादे चिन्ह आले कि थांबणे म्हणजेच विराम करणे.

पूर्णविराम

वाक्य पूर्ण करताना पूर्णविराम वापरले जाते. वाक्य पूर्ण करून विराम  घेण्यासाठी ( थांबण्यासाठी ) पूर्णविराम वापरतात.

अर्धविराम

अर्धविराम वापरून वाक्यामध्ये थांबले जाते, परंतु वाक्य पूर्ण होत नाही.  दोन वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडताना सुद्धा अर्धविराम वापरले जाते.

स्वल्पविराम

वाक्यात एकाच शब्द जातीतील (नाम , सर्वनाम, विशेषण ) अनेक शब्द एकत्र आले तर थोडे थांबावे लागते. तेव्हा स्वल्पविराम वापरले जाते.

अपूर्णविराम

काही गोष्टी या वाक्याच्या शेवटी सांगितल्या जातात त्या गोष्टी सांगण्याआधी अपूर्णविराम वापरले जाते.