नाम व नामाचे प्रकार Naam & Types of Naam In Marathi

नाम म्हणजे काय ? नामाचे प्रकार किती व कोणते ?

मराठी व्याकरण

नाम म्हणजे काय ?

व्यक्तीच्या ठेवलेल्या नावास किंवा त्याच्या गुणधर्माचा बोध करून देणारा शब्द म्हणजे नाम होय.

नामाचे प्रकार किती व कोणते ?

नामाचे एकूण ३ प्रकार पडतात ,ते पुढीलप्रमाणे १) सामान्यनाम २) विशेषनाम ३) भाववाचक नाम

सामान्यनाम 

एकाच प्रकारच्या गटातील वस्तू ,व्यक्ती किंवा त्याच्या सारख्या गुणधर्मामुळे त्या वस्तूच्या गटाला ,जातीला किंवा पदार्थाच्या गटाला जे नाव दिले जाते त्या नामाला सामान्यनाम असे म्हणतात

विशेषनाम 

ज्या नामामुळे फक्त वस्तू ,व्यक्ती किंवा पदार्थ यांच्या जातीचा किंवा गटाचा बोध होत नाही तर त्यामुळे व्यक्तीचा किंवा वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो ,त्या नामाला विशेषनाम असे म्हणतात.

भाववाचक नाम

वाक्यातील ज्या शब्दामुळे सजीव किंवा निर्जीव वस्तूत असलेल्या गुण किंवा धर्म किंवा भाव किंवा स्थिति यांचा बोध होत असेल त्या वाक्यातील शब्दाला भाववाचक नाव असे म्हणतात.