विशेषण म्हणजे काय? | What is Visheshan in marathi

नमस्कार मित्रांनो, विशेषण मराठी व्याकरणातील महत्वाचा विषय आहे. आजच्या या लेखात आपण विशेषण म्हणजे काय? (What is Visheshan in marathi) ? तसेच विशेषणाचे प्रकार किती व कोणते? (Types of Visheshan in marathi), साधीत विशेषणे म्हणजे काय? ( What is Sadhit Visheshan In Marathi), साधीत विशेषणाचे प्रकार कोणते? ( What are the Types of Sadhit Visheshan In Marathi ) ते सविस्तरपणे पाहणार आहोत.
चला तर मग पाहुयात विशेषण व त्याचे प्रकार…

Table of Contents

What is Visheshan in marathi | विशेषण म्हणजे काय?

Visheshan in marathi
Visheshan in marathi

नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात.म्हणजेच असा शब्द जो नामाबद्दल विशेष माहिती सांगतो.

विशेषण उदाहरणे | Visheshan Examples In Marathi

१) राजेश खूप हुशार विद्यार्थी आहे.
२) राजेशकडे लांब दोरी आहे.
३) राजेश चे पाठांतर उत्तम आहे.

What are the types of Visheshan | विशेषणाचे प्रकार कोणते?

विशेषणांचे एकूण प्रकार पडतात.

  • गुणवाचक विशेषण
  • संख्यावाचक विशेषण
  • सार्वनामिक विशेषण

१) गुणवाचक विशेषण | Gunvachak Visheshan In Marathi


नामाचा विशेष गुण दाखवण्यासाठी गुणवाचक विशेषण वापरले जाते.


सुंदर, भित्रा, धाडसी, उंच, बुटका

१) गुलाबाचे फुल किती सुंदर दिसते.
२) राजेश खूप भित्रा आहे.
३) राजेश खूप उंच आहे.


२) संख्यावाचक विशेषण | Sankhyavachak Vishaeshan In Marathi


नामाची संख्या दाखवण्यासाठी संख्यावाचक विशेषण वापरले जाते.


पहिला, दुसरा, दुप्पट, खूप

संख्यावाचक विशेषणाचे प्रकार पडतात.

१) क्रमवाचक संख्याविशेषण | Kramvachak Sankhyavisheshan In Marathi

पहिला, दुसरा


२) गणनावाचक संख्याविशेषण | Gananavachak Sankhyavisheshan In Marathi

पन्नास, शंभर


३) आवृत्तीवाचक संख्याविशेषण | Avruttivachak Sankhyavisheshan In Marathi

दुप्पट, तिप्पट


४) पृथकवाचक संख्याविशेषण | Pruthakvachak Sankhyavisheshan In Marathi

मूळ अर्थ न दर्शविता, शब्दाच्या अर्थामधून वेगळया शब्दाचा बोध होतो.

एक-एक , पाच-पाच

१) पाच-पाच विद्यार्थ्यांनी रांग बनवा.
२) खालीलपैकी दोन-दोन वाक्यांचे गट बनवा.

५) अनिश्चित संख्याविशेषण | Anischit Sankhyavisheshan In Marathi

नामाची निश्चित संख्या व्यक्त होत नाही.


खूप, काही

१) राजेश खूप हुशार आहे.
२) ते भरपूर लांब आहे.

३) सार्वनामिक विशेषण | Sarvnamik Visheshan In Marathi


सार्वनामिक विशेषण हे सर्वनामापासून तयार होते.

माझा, माझी, तुझा, तुझी, त्याचा, त्याची

१) माझ्या मनात तसे काहीच नाही.
२) राजेश हा त्याचा भाऊ आहे.

What is Sadhit Visheshan In Marathi | साधीत विशेषणे म्हणजे काय?

शब्दाच्या जातीचा उपयोग करून जी विशेषण साधली जातात त्यांना साधीत विशेषणे म्हणतात.

What are the Types of Sadhit Visheshan In Marathi | साधीत विशेषणाचे प्रकार कोणते?

साधीत विशेषणाचे साधारणतः प्रकार पडतात.

  • नामसाधीत विशेषणे
  • धातुसाधीत विशेषणे
  • अव्ययसाधीत विशेषणे

१. नामसाधीत विशेषणे | Namsadhit Visheshane In Marathi

नामसाधीत विशेषणे ही नामाचा उपयोग करून तयार होतात.

उदाहरण :

राजेशचे मिठाई दुकान आहे.

२. धातुसाधीत विशेषणे | Dhatusadhit Visheshane In Marathi

धातुसाधीताचा उपयोग हा विशेषण म्हणून केला जातो.

उदाहरण :

राजेशला पिकलेला आंबा फार आवडतो.

३. अव्ययसाधीत विशेषणे | Avyaysadhit Visheshane In Marathi


अव्ययांना प्रत्यय लागून त्यांचा उपयोग विशेषणाप्रमाणे केला जातो.

उदाहरण :

खालची गाडी

Leave a Comment