विरामचिन्हे व त्याचे प्रकार । Punctuation in Marathi | Viram chinh in marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरण ( Marathi Grammar ) मधील अत्यंत महत्वाचा विषय पाहणार आहोत. मित्रांनो , आज आपण विरामचिन्हे व त्याचे प्रकार( Viram chinh in marathi) कोणते ते सविस्तरपणे पाहणार आहोत.

मित्रांनो, जर तुम्ही MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी हा लेख अत्यंत महत्वाचा आहे. कारण अनेक यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विरामचिन्हावर प्रश्न नेहमीच विचारले जातात.या संपूर्ण लेखात आपण विरामचिन्हे म्हणजे काय ? तसेच त्याचे प्रकार कोणते हे पाहणार आहोत. चला तर मग पाहुयात.

विरामचिन्हे म्हणजे काय ? | What is Viram chinh in marathi

मित्रांनो, जर आपण विरामचिन्हे याचा अर्थ पाहिला तर तो होतो वाक्यात एखादे चिन्ह आले कि थांबणे म्हणजेच विराम करणे. जर आपण एखादे वाक्य वाचत असू तर अनेक चिन्हे वाक्यात येतात जसे कि स्वल्प विराम,पूर्ण विराम इ. मग आपण वाक्य तेथे थांबवतो आणि पुन्हा वाचन सुरु करतो. आपण जिकडे थांबतो तिथे चिन्हे असतात, म्हणूनच यास विरामचिन्हे असं म्हणतात.विरामचिन्हे वापरून आपणास हे समजते कि वाक्य वाचताना नेमकं कुठे थांबायचं.लेखकाचा वाक्य लिहिण्याचा अर्थ काय हे सुद्धा काही प्रमाणात समजून येते.

विरामचिन्हांचे प्रकार

विरामचिन्हांचे प्रकार खालीलप्रमाणे

  • पूर्णविराम
  • अर्धविराम
  • स्वल्पविराम
  • अपूर्णविराम
  • प्रश्नचिन्ह
  • उद्गारवाचक चिन्ह
  • अवतरण चिन्ह
  • संयोग चिन्ह
  • अपसरण चिन्ह

पूर्णविराम | Purn Viram In Marathi

( . ) – पूर्णविराम असे दर्शवले जाते.

वाक्य पूर्ण करताना पूर्णविराम वापरले जाते. वाक्य पूर्ण करून विराम घेण्यासाठी ( थांबण्यासाठी ) पूर्णविराम वापरतात.तसेच जेव्हा आपण नावाचे संक्षिप्त रूप वापरतो तेव्हा सुद्धा विरामचिन्ह वापरली जातात.

उदाहरणे :

१. राजेश क्रिकेट खेळतो.
२. तो जेवण करतो.
३. त्याचे काम पूर्ण झाले.
४. वि. वा. शिरवाडकर ( विष्णु वामन शिरवाडकर )

अर्धविराम | Ardh Viram In Marathi

( ; ) – अर्धविराम असे दर्शवले जाते.

अर्धविराम वापरून वाक्यामध्ये थांबले जाते, परंतु वाक्य पूर्ण होत नाही. दोन वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडताना सुद्धा अर्धविराम वापरले जाते.

उदाहरणे :

१. राजेशने शेती नांगरली; पण पाऊस आलाच नाही.
२. खूप मुले परीक्षेस बसली; परंतु कोणीच उत्तीर्ण झालेच नाही.
३. राजेशने खूप अभ्यास केला; म्हणून तो उत्तीर्ण झाला.

स्वल्पविराम | Swalp Viram In Marathi

( , ) – स्वल्पविराम असे दर्शवले जाते.

वाक्यात एकाच शब्द जातीतील (नाम , सर्वनाम, विशेषण ) अनेक शब्द एकत्र आले तर थोडे थांबावे लागते. तेव्हा स्वल्पविराम वापरले जाते.

उदाहरणे :

१ .राजेशने बाजारातून कांदा, बटाटे आणि लसूण आणले.
२. दिवाळीत लवंगी, रॉकेट, भुईचक्कर आणि पाऊस असे अनेक फटाके फोडले जातात.
३. दिवाळीत घरे फुलांनी, रांगोळ्यांनी आणि रोषणाई करून सजवली जातात.

अपूर्णविराम | Apurn Viram In Marathi

( : ) – अपूर्णविराम असे दर्शवले जाते.

काही गोष्टी या वाक्याच्या शेवटी सांगितल्या जातात त्या गोष्टी सांगण्याआधी अपूर्णविराम वापरले जाते.

उदाहरणे :

१. राजेशचे तीन छंद आहेत: क्रिकेट खेळणे, चित्रपट पाहणे आणि फिरायला जाणे.
२. राजेशला तीन विषय आवडतात: इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र

प्रश्नचिन्ह | Prashn Chinh In Marathi

( ? ) – प्रश्नचिन्ह असे दर्शवले जाते.

वाक्यातून प्रश्न विचारत असल्यास प्रश्नचिन्ह वापरले जाते.

उदाहरणे :

१. तू कुठे राहतोस ?
२. तुझा आवडता प्राणी कोणता ?
३. तुझा आवडता विषय कोणता ?

उद्गारवाचक चिन्ह | Udgar Vachak Chinh In Marathi

( ! ) – उद्गारवाचक चिन्ह असे दर्शवले जाते.

एखाद्या वाक्यात मनातील भावना व्यक्त करण्यासाठी जी चिन्ह वापरली जातात त्यास उद्गारवाचक चिन्ह असे म्हणतात.

उदाहरणे :

१. अबब ! किती मोठा पाऊस.
२. अहाहा ! किती सुंदर फुल.
३. बापरे ! केवढा मोठा हत्ती.

अवतरण चिन्ह | Avatran Chinh In Marathi

( ‘ ‘ ) – एकेरी अवतरण चिन्ह असे दर्शवले जाते.

( ” ” ) – दुहेरी अवतरण चिन्ह असे दर्शवले जाते.

एखाद्या वाक्यातील महत्वाचा शब्द एकेरी अवतरण चिन्हात लिहिला जातो.

एखाद्याने बोललेलं वाक्य दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह वापरले जाते.

उदाहरणे :

१. माझे नाव ‘तुषार’ आहे.
२. राजेश म्हणाला, “मी खूप हुशार आहे “.

संयोग चिन्ह | Sanyog Chinh In Marathi

( – ) – संयोग चिन्ह असे दर्शवले जाते.

एखाद्या वाक्यात दोन शब्द जोडतांना संयोग चिन्ह वापरली जातात.

उदाहरणे (संयोग चिन्ह वाक्य मराठी):

१. राजा-राणी
२. आंबट-गोड

अपसरण चिन्ह | Apasaran Chinh In Marathi

( — ) – अपसरण चिन्ह असे दर्शवले जाते.

वाक्यात जेव्हा एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यावे लागते तेव्हा अपसरण चिन्ह वापरले जाते.म्हणजेच एखादी गोष्ट अधिक स्पष्टपणे सांगायची असल्यास अपसरण चिन्ह वापरले जाते.

उदाहरणे :

१. राजेश ला पुत्र दोन — चेतन आणि चैतन्य
२. चेतन — चैतन्यचा सख्खा भाऊ आहे.

विरामचिन्हाचे प्रकार आणि ते कसे दर्शवितात

विरामचिन्ह नावचिन्ह
पूर्णविराम.
अर्धविराम;
स्वल्पविराम,
अपूर्णविराम:
प्रश्नचिन्ह?
उद्गारवाचक चिन्ह!
अवतरण चिन्ह‘ ‘ किंवा ” “
संयोग चिन्ह
अपसरण चिन्ह
विरामचिन्हाचे प्रकार आणि ते कसे दर्शवितात

Leave a Comment