वर्ण आणि वर्णाचे प्रकार | Varn & Types of Varn

नमस्कार मित्रांनो , आज आपण मराठी व्याकरणातील ( Marathi Grammar ) महत्वाचा विषय पाहणार आहोत. वर्ण आणि त्याचे प्रकार कोणते (Varn & Types of Varn) ते आपण अभ्यासणार आहोत.

वर्ण म्हणजे काय? | वर्णाची व्याख्या | What is Varn?

जो मूलध्वनी तोंडावाटे निघतो त्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात . आपल्या मराठी भाषेत एकूण ४८ वर्ण आहेत .या वर्णाच्या मालिकेलाच वर्णमाला किंवा मुळाक्षरे असे म्हणतात.  
मूळाक्षरे

अ ,आ ,इ ,ई ,उ ,ऊ ,ॠ  ,ऌ  ,ए ,ऐ,ओ ,ओ,अं , अं:                

क ,ख ,ग ,घ ,ङ , च ,छ ,ज ,झ ,त्र  , 

ट ,ठ,ड ,ढ ,ण , त ,थ ,द ,ध,न ,     

प ,फ ,ब ,भ ,म ,य ,र ,ल ,व ,             

श ,ष ,स, ह ,ळ

वर्णाचे प्रकार किती व कोणते? | Types of Varn in marathi

वर्णाचे ३ प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे 

१) स्वर 
२) स्वरादी 
३) व्यंजने 

१) स्वरस्वर म्हणजे वर्णाचा उच्चार करताना  कंठातील कोणत्याही अवयवाची गरज न पडणे .यामुळे स्वर हे पूर्ण उच्चाराचे मानले जातात . मराठी भाषेत एकूण १२ स्वर आहेत.
स्वर –   अ ,आ ,इ ,ई ,उ ,ऊ ,ॠ  ,ऌ  ,ए ,ऐ,ओ ,ओ
स्वरांचे एकूण ३ प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे
१) दीर्घ स्वर  २) संयुक्त स्वर ३)  ऱ्हस्व स्वर 


२. स्वरादी – स्वर आहे ज्याच्या आधी असा वर्ण त्याला स्वरादी म्हणतात . 
स्वरादीचे एकूण ३ प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे
१) अनुस्वार २) अनुनासिक ३) विसर्ग 


३. व्यंजने -मराठी वर्णमालिकेतील क ते ळ पर्यंतच्या वर्णाचा पूर्ण उच्चार करताना स्वरांची गरज पडते अशा वर्णांना व्यंजने असे म्हणतात .व्यंजने एकूण ३४ आहेत . 
व्यंजने – क् ,ख् ,ग् ,ङ् ,च ,छ,ज् ,झ्,ञ्,ट्, ठ्, ड्, ढ्, ण्,त्, थ्, द्, ध्, न्,प्, फ्, ब्, भ्, म्,य्‌,व् ,र्,ल्‌,श्,ष्,स् ,ह्‌ ,ळ्‌

हे पण वाचा :

शब्दाच्या जाती

वर्ण म्हणजे काय ?

जो मूलध्वनी तोंडावाटे निघतो त्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात.आपल्या मराठी भाषेत एकूण ४८ वर्ण आहेत.

वर्णाचे प्रकार किती व कोणते ?

वर्णाचे ३ प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे 
१) स्वर 
२) स्वरादी 
३) व्यंजने 

Leave a Comment