Site icon देवनागरी मराठी

वडा पाव रेसिपी | Vada Pav Recipe In Marathi

Vada Pav Recipe In Marathi

Vada Pav Recipe In Marathi

नमस्कार मित्रांनो,आज आपण पाहणार आहोत वडा पाव बनवण्याची रेसिपी – Vada Pav Recipe In Marathi मराठीतून. माघील रेसिपी लेखात आपण रव्याची इडली कशी करावी ते पाहिले या लेखात आपण वडा पाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य – Vada Pav Ingredients In Marathi आणि वडा पाव बनवण्याची कृती – Vada Pav Making Process In Marathi हे सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूयात.

वडा पाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य –  Vada Pav Ingredients In Marathi

वडा पाव बनवण्याची कृती – Vada Pav Making Process In Marathi

प्रथम आपण बटाटे उकडून घेऊ व थंड झाले की त्याचे साल काढून घेऊ आणि स्मॅशरने चांगले बारीक करून घेऊ.आता कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊ आणि त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसुन, हळद व कांदा बारीक चिरलेला टाकून घेऊन व चांगले परतून घेऊ. नंतर, त्यात आपण कोथिंबीर, हिरवी मिरची चार-पाच, आलं आणि धने थोडेसे टाकून मिक्सरला चांगले फिरवून घेऊ व ते मिश्रण फोडणीमध्ये टाकून घेऊ आता सगळ्यात शेवटी आपण स्मॅश केलेले बटाटे त्या मिश्रणात टाकू चांगले परतवून घेऊ सगळ्यात शेवटी आवश्यकतेनुसार मीठ टाकून घेऊ आपली भाजी तयार झाली आता ती थंड करून घेऊ.

आता आपण एका पातेल्यात दोन वाटी बेसन पीठ घेऊन एक छोटा चमचा ओवा, थोडे चवीनुसार मीठ व हळद टाकून हे मिश्रण पाण्याने चांगले कालवून घेऊ हे मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ करू नये व त्यात सगळ्यात शेवटी थोडा खायचा सोडा टाकून चांगले मिक्स करून घेऊ.

आपण जी बटाट्याची भाजी बनवली आहे त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ व आता कढईमध्ये तळण्यासाठी तेल टाकून घेऊ.आता तेल तापले की गॅस कमी करून त्यात आपण बटाट्याच्या भाजीचे जे गोळे बनवले आहे ते बेसन पिठात बुडवून ते तेलात तळून घेऊ.अशाप्रकारे, आपले बटाटेवडे खायला तयार हे आपण पाव आणून त्यासोबत खाऊ व तळलेल्या हिरव्या मिरच्या किंवा पुदिना चटणी सोबत तोंडी लावायला घेऊ शकतो.

Exit mobile version