नाम व नामाचे प्रकार | Naam & Types of Naam In Marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातील महत्वाचा विषय पाहणार आहोत तो म्हणजे नाम. तसेच नाम व नामाचे प्रकार किती व कोणते (Naam & Types of Naam In Marathi) ते सुद्धा सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूयात.

नाम म्हणजे काय ? | What is Naam In Marathi

व्यक्तीच्या ठेवलेल्या नावास किंवा त्याच्या गुणधर्माचा बोध करून देणारा शब्द म्हणजे नाम होय.
नाम हे प्रत्यक्षात असलेल्या सजीव किंवा निर्जीव वस्तूच्या नावाला म्हणतात.

नामाचे प्रकार किती व कोणते ? | Types of Naam In Marathi

नामाचे एकूण ३ प्रकार पडतात ,ते पुढीलप्रमाणे
१) सामान्यनाम
२) विशेषनाम
३) भाववाचक नाम

१) सामान्यनाम –

एकाच प्रकारच्या गटातील वस्तू ,व्यक्ती किंवा त्याच्या सारख्या गुणधर्मामुळे त्या वस्तूच्या गटाला ,जातीला किंवा
पदार्थाच्या गटाला किंवा प्राण्याच्या गटाला जे नाव दिले जाते त्या नामाला सामान्यनाम असे म्हणतात.

उदा . -झाड ,शाळा ,घर,स्वर्ग,विद्यालय ,मास्तर ,साखर ,गाय ,चिवडा ,केली इ.

२) विशेषनाम –

ज्या नामामुळे फक्त वस्तू ,व्यक्ती किंवा पदार्थ यांच्या जातीचा किंवा गटाचा बोध होत नाही तर त्यामुळे जातीतील अथवा
गटातील विशिष्ट व्यक्तीचा किंवा वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो ,त्या नामाला किंवा नावाला विशेषनाम असे म्हणतात.

उदा. राधा, सिंधू,हिमालय,पिवळा,महाराष्ट्र ,भारत इ.

३) भाववाचक नाम-

वाक्यातील ज्या शब्दामुळे सजीव किंवा निर्जीव वस्तूत असलेल्या गुण किंवा धर्म किंवा भाव किंवा स्थिति यांचा बोध होत
असेल त्या वाक्यातील शब्दाला भाववाचक नाव असे म्हणतात.

उदा. धैर्य ,सौंदर्य ,मरण ,बाल्य ,तरुण,केविलवाणा ,समजदार,कठीण,शहाणा इ.

Leave a Comment