प्रजासत्ताक दिन निबंध | Republic day essay in marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रजासत्ताक दिन या विषयावर निबंध (Republic day essay in marathi) पाहणार आहोत. मित्रांनो, प्रजासत्ताक दिन यालाच गणराज्य दिन असेही म्हंटले जाते. चला तर मग पाहुयात प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व…

२६ जानेवारी १९५० या दिवशी भारताचे संविधान आमलात आणले गेले. त्यामुळे, दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.

२६ जानेवारी राजधानी दिल्लीतून पंतप्रधान संपूर्ण राष्ट्राला उद्देशून भाषण करतात तसेच या दिवशी राजपथावर परेड काढली जाते. अनेक देशांचे पंतप्रधान आणि अध्यक्ष या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जातात. भारतातील सर्व राज्य या कार्यक्रमात सहभागी होतात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवतात.

संपूर्ण भारतात प्रत्येक शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजवंदन केले जाते.सर्व लहान मुले, मोठी माणसे या दिवशी राष्ट्र ध्वजासमोर नतमस्तक होतात. या दिवशी सर्व शाळा / कॉलेज सजवली जातात. अनेक मुले प्रजासत्ताक दिन या विषयावर भाषणे देतात. फक्त शाळा / कॉलेज नाही तर प्रत्येक गावापासून शहरापर्यंत तसेच शासकीय कार्यलयामध्ये सुद्धा ध्वजारोहण केले जाते. इतकेच नाही तर अनेक इमारतींमध्ये सुध्दा ध्वजारोहण केले जाते आणि अनेक कार्यक्रम ठेवले जातात.

अशाप्रकारे, संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन हा आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो.

Republic day essay in marathi

Leave a Comment