रव्याची इडली रेसिपी | Ravyachi Idli Recipe In Marathi

नमस्कार मित्रांनो,आज आपण पाहणार आहोत रव्याची इडली बनवण्याची रेसिपी – Ravyachi Idli Recipe In Marathi मराठीतून. माघील रेसिपी लेखात आपण नारळाची चटणी कशी करावी ते पाहिले या लेखात आपण रव्याची इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य – Ravyachi Idli Ingredients In Marathi आणि रव्याची इडली बनवण्याची कृती – Ravyachi Idli Making Process In Marathi हे सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूयात.

रव्याची इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य –  Ravyachi Idli Ingredients In Marathi

 • रवा 2 वाटी
 • दही 1 वाटी
 • जिरे
 • मोहरी
 • लाल तिखट
 • हळद
 • खायचा सोडा छोटा अर्धा चमचा
 • कढीपत्ता
 • कोथिंबीर
 • तेल
 • मीठ

रव्याची इडली बनवण्याची कृती – Ravyachi Idli Making Process In Marathi

प्रथम रवा 2 वाटी आणि दही 1 वाटी घेऊन ते एका भांड्यात एकत्र घेऊन चांगले हलवून घेऊ व एक तास भिजत ठेवूया.

1 तास झाल्यानंतर आपण कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेऊ त्यात जिरे, मोहरी,कढीपत्ता टाकू व ते सगळे तडतडले कि ते मिश्रणामध्ये टाकू. नंतर, त्यात लाल तिखट, मीठ चवीनुसार, हळद, कोथिंबीर आणि खायचा सोडा छोटा अर्धा चमचा घेऊ व त्या मिश्रणात टाकू व एका दिशेने हलवून घेऊ.आपण हे मिश्रण 10 मिनीटे हलवून घेऊ.

आता आपले इडलीचे पीठ तयार आहे. इडलीचे भांड घेऊन त्यामध्ये इडल्या वाफवून घेऊ व चटणी सोबत आपण सर्व करूया.आपली इन्स्टंट रव्याची इडली खायला तयार आहे.आपण ही रव्याची इडली नारळाची चटणी किंवा सांबार किंवा दही रायता या सोबत खाऊ शकतो.

Leave a Comment