माझा आवडता ऋतू – पावसाळा | पावसाळा निबंध | Rainy Season Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण माझा आवडता ऋतू – पावसाळा या विषयावर निबंध (Rainy Season Essay In Marathi) पाहणार आहोत. मित्रांनो, तुमच्यापैकी अनेक जणांचा पावसाळा हा आवडता ऋतु असेल. कारण, या पावसाळ्यात अनेक आठवणी दडलेल्या आहेत. म्हणूनच, पावसाळा या विषयावर मी तुमच्यासाठी खास निबंध घेऊन आलो आहे. चला तर मग सविस्तरपणे पाहुयात पावसाळा या विषयावर निबंध…

पावसाळा हा ऋतू साधारणपणे जून या इंग्रजी महिन्यापासून सुरू होतो आणि सप्टेंबरमध्ये संपतो. हा ऋतू सुरू होण्यासाठी नुसता चातक पक्षीच नाही तर प्रत्येक जण तेवढ्याच आतुरतेने याची वाट पाहत असतो. त्यामागे कारणही तसंच असत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी उन्हाळा असतो. त्यामुळे, गर्मीमुळे सर्वजण हैराण झालेले असतात. सर्व नदी, सरोवर आणि पाण्याचे स्त्रोत आटलेले असतात. म्हणूनच, अशावेळी सर्व जण पावसाळ्याची वाट पाहत असतात. सर्वांना वेध लागतात ते कधी एकदा पाऊस पडतो याचे. सर्वजण आकाशाकडे पाहून प्रार्थना करत असतात.

अशा सर्व प्रार्थना वरुण देवाकडून मान्य होतात आणि मग मेघ गर्जतात आणि संपूर्ण मातीतुन सुगंध पसरतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व पहिल्या पावसात मनसोक्त भिजतात. लहानमुले “ये रे ये रे पावसा” हे गाणं म्हणत पाण्यात कागदी होड्या सोडतात.

पाऊस पडल्यानंतर सर्वत्र गारवा पसरतो. बळीराजा सुद्धा शेतीच्या कामाला सुरुवात करतो.सर्व जल स्त्रोत पुन्हा पाण्याने भरली जातात. या पावसाळ्यात खास मजा असते ती म्हणजे इंद्रधनुष्य पहायची.

या दिवसात लहानमुले रेनकोट घालून शाळेत जातात. अनेकदा, जास्त पाऊस पडल्यामुळे शाळांना सुट्टी दिली जाते.मग मुले पावसात भिजत भिजतच घरी येतात.लहानसोबत मोठ्या माणसांची सुद्धा मज्जा असते. कारण, अनेक कार्यलयामध्ये सुट्टी दिली जाते. मग, मोठे लोक घरी येताना मस्त चहा आणि कांदा भजींचा आस्वाद घेत घरी येतात.

तर अशा पध्दतीने पावसाळा हा सर्वांचाच आवडता ऋतु ठरतो.

Leave a Comment