पुरणपोळी रेसिपी | Puranpoli Recipe In Marathi

नमस्कार मित्रांनो,आज आपण पाहणार आहोत पुरणपोळी बनवण्याची रेसिपी – Puranpoli Recipe In Marathi मराठीतून. माघील रेसिपी लेखात आपण पाव भाजी कशी करावी ते पाहिले या लेखात आपण पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – Puranpoli Ingredients In Marathi आणि पुरणपोळी बनवण्याची कृती – Puranpoli Making Process In Marathi हे सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूयात.

पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य –  Puranpoli Ingredients In Marathi

  • चना डाळ एक वाटी
  • गूळ एक वाटी
  • वेलची पूड
  • जायफळ पूड
  • एक मोठी वाटी कणीक किंवा गव्हाचे पीठ
  • एक मोठी वाटी मैदा
  • मीठ चवीनुसार
  • तेल
  • तूप

पुरणपोळी बनवण्याची कृती – Puranpoli Making Process In Marathi

सर्वप्रथम आपण चणाडाळ धुऊन घेऊ. नंतर, ‌कुकर मध्ये चना डाळ व पाणी टाकून घेऊ व पाच शिट्ट्या करून घेऊ. आता आपण शिजलेल्या चना डाळीचे पाणी काढून घेऊ. आता आपण गॅसवर कढई ठेवून त्यात शिजवून घेतलेली चणाडाळ व गूळ टाकू. ते मऊ होईपर्यंत तर चांगले हलवत राहावे. डाळ आणि गूळ एकत्र झाले व त्यातील पाणी पूर्ण आटले की आपण ते थोडे गार झाले की ते पुरणपोळीच्या चाळणीने बारीक करून घेऊ आता त्यात वेलची पूड व जायफळ पूड टाकू. हे आपले पुरणाचे सारण तयार झाले.

एका ताटात एक वाटी कणीक,एक वाटी मैदा आणि थोडे मीठ टाकून घेऊ व ते पीठ पाण्याने चांगले मळून घेऊ व ते वीस मिनिट तसेच ठेवू.

आता दोन छोटे लिंबाएवढे पीठाचे गोळे घेऊन ते थोडे लाटून घेऊ व त्यात मावेल एवढे पुरणाचे सारण टाकून छान पोळीच्या कडा दाबून ती पोळी हलक्या हाताने लाटून घेऊ.नंतर, तव्यावर टाकू व ती पोळी दोन्ही बाजूने तूप लावून भाजून घेऊ. आपली पुरणपोळी खाण्यासाठी तयार आहे.

Leave a Comment