पाव भाजी रेसिपी | Pav Bhaji Recipe In Marathi

नमस्कार मित्रांनो,आज आपण पाहणार आहोत पाव भाजी बनवण्याची रेसिपी – Pav Bhaji Recipe In Marathi मराठीतून. माघील रेसिपी लेखात आपण पालक भजी कसे करावे ते पाहिले या लेखात आपण पाव भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – Pav Bhaji Ingredients In Marathi आणि पाव भाजी बनवण्याची कृती – Pav Bhaji Making Process In Marathi हे सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूयात.

पाव भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – Pav Bhaji Ingredients In Marathi

 • बटाटे 4
 • टमाटर 2
 • सिमला मिरची 2
 • फ्लॉवर छोटी वाटी
 • कांदा 2
 • कोथिंबीर
 • पावभाजी मसाला
 • लाल तिखट
 • हळद
 • मीठ
 • जिरे
 • मोहरी
 • गरम मसाला
 • धना पावडर
 • तेल आवश्यकतेनुसार
 • आलं
 • कडीपत्ता
 • हिरवी मिर्ची
 • मटार एक छोटी वाटी
 • बीट 1
 • साखर (छोटे 2 चमचे)

पाव भाजी बनवण्याची कृती – Pav Bhaji Making Process In Marathi

सर्वप्रथम आपण बटाटे, सिमला मिरची, फ्लॉवर, टमाटर, मटार, बीट हे सगळे आपण धुऊन घेऊ नंतर ते सगळे बारीक चिरून एका कुकर मध्ये ठेवून नंतर कुकर मध्ये भाज्या बुडेल एवढे पाणी टाकून येऊ आणि त्यात थोडे मीठ टाकून घेऊ आणि पुढे कुकरच्या चार शिट्ट्या घेऊन ह्या सगळ्या भाज्या शिजवून घेऊ. भाज्या शिजल्यानंतर आपण कुकर थंड होण्यासाठी ठेवूया.

आता कुकर थंड होईपर्यंत तर आपण पावभाजी साठी लागणारी पेस्ट तयार करून घेऊया त्यासाठी आपल्याला एक टमाटर, एक कांदा, हिरवी मिरच्या 2, आलं हे सगळे लागेल हे सर्व घेऊन आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. आता कुकर खोलून भाज्या आपण काढून घेऊन आणि त्या स्मॅशर ने बारीक करून घेऊ या.

आता आपण पावभाजीला फोडणी देऊन घेऊ त्यासाठी गॅस वर आपण एक कढई ठेवूया त्यात आवश्यकतेनुसार तेल टाकून त्यात आपण कढीपत्ता, जिरे, मोहरी व पावभाजी साठी बनवलेली पेस्ट टाकून घेऊ या व त्याला चांगले परतून घेऊ पेस्ट मधील पाणी कमी झाले की पेस्ट वरती तेलाची तेलाची फोडणी दिसेल असे झाले की मग त्यात आपण लाल तिखट, हळद, धने पावडर ,पावभाजी मसाला ,गरम मसाला आणि थोडी साखर आणि मीठ आवश्यकतेनुसार टाकूया नंतर हे सगळे परतून घेऊ नंतर त्यात आपण बारीक केलेल्या सर्व भाज्या टाकून घेऊ गरज वाटल्यास त्यात थोडे गरम पाणी टाकून व ते चांगली उकळून घेऊ व सगळ्यात शेवटी आपण कोथिंबीर टाकून टाकून घेऊ. अशाप्रकारे,आपली पावभाजी खाण्यासाठी तयार आहे.

Leave a Comment