How to start Paper Plate Manufacturing business in marathi | पेपर प्लेट बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करावा

पेपर प्लेट ही वस्तू जवळ जवळ सर्वांच्या घरी अगदी सहजपणे आढळते. कारण, पेपर प्लेट ही आपल्याला प्रत्येक कार्यक्रमात उपयोगी येते. कार्यक्रमात जेवणाचे किंवा नाष्टाचे पदार्थ वाढण्यास याचा उपयोग केला जातो.


त्यामुळे, गाव असो किंवा शहर याचा उपयोग सर्वच ठिकाणी केला जातो. म्हणून याची मागणी प्रचंड असते.पेपर प्लेट बनवण्याचा व्यवसाय हा कमी पैशातही सुरू केला जाऊ शकतो. मग चला आपण जाणून घेऊयात या व्यवसायाविषयी…

पेपर प्लेट बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल | Paper plate raw material

  • प्रिंटेड पेपर – 30-40 रूपये / कि.ग्रॅम.
  • बाॅटम रील – 40 रूपये / कि.ग्रॅम.

Note : वर दिलेल्या raw material price या तुमच्या राज्यात, शहरात किंवा गावात वेगळ्या असू शकतात.

पेपर प्लेट बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल कोठे मिळेल | Where to get Paper plate raw material

जर आपण पेपर प्लेट उद्योगात येणार असाल तर आपणास हे सुद्धा माहित असणे आवश्यक आहे कि या उद्योगाला लागणारा कच्चा माल कोठे भेटतो. जर आपणास ऑनलाईन पाहायचे असेल तर तुम्ही Indiamart या वेबसाइट ला भेट देऊ शकतात. तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला एक लिंक दिली आहे. त्या वर क्लिक करून तुम्ही कच्चा मालाची माहिती घेऊ शकता.

https://dir.indiamart.com/search.mp?ss=paper+plate+raw+material

पेपर प्लेट बनवण्यासाठी लागणारी मशीनरी | Paper plate making machine

जर आपणास पेपर प्लेट बनवण्यासाठी लागणारी मशीनरी बद्दल जाणून घ्यायच असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करू शकता.

https://dir.indiamart.com/search.mp?ss=paper+plate+making+machine

पेपर प्लेट बनवण्यासाठी लागणारी मशीनरीची किंमत | Paper plate making machinery price

पेपर प्लेट बनवण्यासाठी लागणारी मशीन विविध प्रकारात भेटते. जर आपणांस हा उद्योग कमी खर्चात करायचा असेल तर आपण हातावर चालणारी ( manual ) मशीन घेऊ शकतो किंवा स्वयंचलीत ( automatic ) मशीन घेऊ शकतो.

  • हातावर चालणारी ( manual ) मशीन – 10000 -25000 रूपये
  • स्वयंचलीत ( automatic ) मशीन – 30000 – 60000 रूपये

Note : वर दिलेल्या raw material price या तुमच्या राज्यात, शहरात किंवा गावात वेगळ्या असू शकतात.

पेपर प्लेट व्यवसाय नफा | Paper plate business profit


मित्रांनो, जर तुम्ही एका दिवसात 15000 ते 20000 प्लेट तयार करत असाल आणि त्या विकत असाल तर तुम्ही दिवसाला 500 – 1000 रुपये (अंदाजे) कमवू शकता. ( नफा हा तुम्ही पेपर प्लेट कोठे विकता आणि कच्चा माल, तुमचा इतर खर्च यावर अवलंबून आहे त्यामुळे नफा बदलू शकतो ).

पेपर प्लेट व्यवसाय मार्केटिंग कशी करावी । Paper plate business marketing


व्यवसायात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मार्केटिंग. मग तो कोणताही व्यवसाय असू द्या तयार झालेला माल हा तुम्हाला योग्य किमतीत विकता आला पाहिजे. जर तुम्हाला तयार झालेल्या पेपर प्लेट विकायच्या असतील तर त्या खालील पद्धतीने विकू शकता.

तुम्ही तयार झालेला माल होलसेलर ला विकू शकतात. परंतु, या पर्यायामध्ये तुम्हाला मालाची किंमत कमी मिळू शकते पण तुमचा माल जास्त विकला जाऊ शकतो. जर तुमचं उत्पादन जास्त आहे तर तुम्ही या पर्यायाचा विचार करू शकता.

तयार माल छोट्या दुकानदारांना विकू शकता. इथे तुम्हाला जास्त किंमत मिळू शकते परंतु माल कमी विकला जाईल.

ऑनलाईन पद्धतीने ( whatsapp, facebook , indiamart , tradeindia )

हॉटेल्स, केक शॉप्स, हलवाई तसेच किराणा दुकान येथे विकू शकता.

जर तुमच्या ओळखीत कोणी event management किंवा केटरर्स करत असेल त्यांना सुद्धा विकू शकता.

Note : कोणताही व्यवसाय चालू करताना त्यातील तज्ञ मंडळींचा सल्ला जरूर घ्या. तसेच व्यवसाय चालू करण्याआधी मार्केट रिसर्च जरूर करा.व्यवसाय हा तुम्ही तुमच्या जोखमीवर करा. devanagrimarathi.com ची टीम किंवा लेखक फायदा अथवा नुकसानाला जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी. धन्यवाद !!!

Leave a Comment