पालक भजी रेसिपी | Palak Bhaji Recipe In Marathi

नमस्कार मित्रांनो,आज आपण पाहणार आहोत पालक भजी बनवण्याची रेसिपी – Palak Bhaji Recipe In Marathi मराठीतून. माघील रेसिपी लेखात आपण गिलके (घोसाळी) भजी कशी करावी ते पाहिले या लेखात आपण पालक भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – Palak Bhaji Ingredients In Marathi आणि पालक भजी बनवण्याची कृती – Palak Bhaji Making Process In Marathi हे सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूयात.

पालक भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य | Palak Bhaji Ingredients In Marathi

  • बेसन पीठ १ वाटी
  • १ वाटी चिरलेला पालक
  • हिरवी मिरची लसूण आलं पेस्ट १ चमचा
  • हळद अर्धा चमचा
  • ओवा पाव चमचा
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर
  • खाण्याचा सोडा पाव चमचा
  • तळण्यासाठी तेल

पालक भजी बनवण्याची कृती | Palak Bhaji Making Process In Marathi

सर्वप्रथम आपण बेसन पीठ १ वाटी घेऊ त्यात पाव चमचा ओवा टाकूया ओवा टाकताना तो हाताने चोळून घेऊ त्यामुळे ओव्याचा स्वाद भजींना छान येतो नंतर त्यात चवीनुसार हिरवी मिरची लसूण आलं पेस्ट १ चमचा, हळद अर्धा चमचा, नंतर १ वाटी चिरलेला  पालक घेऊ व  मीठ टाकूया व कोथींबीर पण टाकूया नंतर हे मिश्रण आपण पाणी टाकून मिक्स करून घेऊ व सगळ्यात शेवटी पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून छान मिक्स करून घेऊ.

आता कढईत तेल तापत ठेऊ गॅस मध्यम आचेवर ठेऊ व तेल तापले की वरील मिश्रणाचे सुपारी एवढे गोळे तेलात टाकू व तळून घेऊ.ही भजी आपण चिंचेची चटणी किंवा पुदिन्याची चटणी यासोबत खाऊ शकतो.

Leave a Comment