नारळाची चटणी रेसिपी | Naralachi Chatni Recipe In Marathi

नमस्कार मित्रांनो,आज आपण पाहणार आहोत नारळाची चटणी बनवण्याची रेसिपी – Naralachi Chatni Recipe In Marathi मराठीतून. माघील रेसिपी लेखात आपण आप्पे कसे करावे ते पाहिले या लेखात आपण नारळाची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – Naralachi Chatni Ingredients In Marathi आणि नारळाची चटणी बनवण्याची कृती – Naralachi Chatni Making Process In Marathi हे सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूयात.

नारळाची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य –  Naralachi Chatni Ingredients In Marathi

 • ओल्या नारळाचे वाटीभर काप
 • हिरव्या मिरच्या 2
 • अर्धा इंच आलं
 • साखर 2 चमचे
 • जिरे
 • मोहरी
 • मीठ
 • कढीपत्ता
 • तेल
 • लाल सुकी हिरवी मिरची १
 • हिंग
 • कोथिंबीर आवश्यकतेनुसार

नारळाची चटणी बनवण्याची कृती – Naralachi Chatni Making Process In Marathi

सर्वप्रथम आपण मिक्सरच्या भांड्यात ओल्या नारळाचे वाटीभर काप,हिरव्या मिरच्या 2, अर्धा इंच आलं, साखर 2 चमचे, कोथिंबीर आवश्यकतेनुसार आणि मीठ टाकून घेऊ व मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ.

आता हे सर्व मिश्रण एका भांड्यात काढून घेऊन व आपण त्याला वरून फोडणी करून घेऊया. त्यासाठी,आपण गॅस वर एका कढईत तेल टाकून देऊ व त्यात जिरे,मोहरी, हिंग, कढीपत्ता व 1 सुकी लाल मिरची हे टाकू व फोडणी तडतडली की ती फोडणी मिश्रणात टाकू व चांगले हलवून घेऊ. सोपी नारळाची चटणी खाण्यासाठी तयार आहे.

Leave a Comment