My favorite sport essay in marathi | माझा आवडता खेळ निबंध

नमस्कार मित्रांनो, आज आपण माझा आवडता खेळ – क्रिकेट (My favorite sport essay in marathi) या विषयावर निबंध पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूयात…

My favorite sport essay in marathi | माझा आवडता खेळ निबंध | Cricket essay in marathi

मला लहान असल्यापासूनच वेगवेगळे खेळ खेळायला आणि पाहायला आवडतात. परंतु, या सगळ्यात क्रिकेट हा माझा अत्यंत आवडीचा खेळ आहे.मी अनेकदा क्रिकेट खेळून आमच्या शाळेचे प्रतिनिधित्व केले आहे. मी माझ्या शाळेसाठी अनेकदा ट्रॉफी जिंकून दिली आहे.फक्त शाळेतच नव्हे तर आमच्या सोसायटी मध्ये सुद्धा क्रिकेट च्या स्पर्धा असतात तेव्हा सुद्धा मी त्यात भाग घेतो.

क्रिकेटमध्ये मला फलंदाजी आणि यष्टिरक्षण करायला खूप आवडते. किंबहुना, याच माझ्या जमेच्या बाजू आहेत.जेव्हा कधी मी कॅप्टन असेल तेव्हा नेहमी मी फलंदाजी स्वीकारतो कारण मला असे वाटते की प्रथम फलंदाजी करून आपण जास्तीत जास्त धावा करू शकतो.

आम्ही रोज शाळेतील मैदानात क्रिकेट ची प्रॅक्टिस करत असतो.शाळा झाली की घरी आल्यावर देखील १ तास मी क्रिकेटच खेळतो. हल्ली चालू असलेल्या २०-२० मॅचेस सुद्धा मी आवडीने बघतो. राहुल द्रविड हा माझा सर्वात आवडता खेळाडू आहे. त्यासारखेच बनायचे हे माझे स्वप्न आहे. म्हणूनच, बाबांनी मला क्रिकेट किट आणून दिली आहे. क्रिकेट खेळून भारताचे नाव जगात उंच करायचं हे सुद्धा माझं स्वप्न आहे.

हे पण वाचा

माझा आवडता ऋतू – पावसाळा | पावसाळा निबंध | Rainy Season Essay In Marathi

मित्रांनो, माझा आवडता खेळ निबंध (My favorite sport essay in marathi) हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे जरूर कमेंट करून कळवा. धन्यवाद!!!

Leave a Comment