My favorite pet animal essay in marathi | माझा आवडता पाळीव प्राणी निबंध

नमस्कार मित्रांनो, आज आपण माझा आवडता पाळीव प्राणी – कुत्रा (My favorite pet animal essay in marathi) याविषयावर निबंध पाहणार आहोत.

मित्रांनो, आज आपण आपल्या आसपास पाहिले तर अनेक लोक कुत्र्याला पाळतात. त्याचे नामकरण देखील आवडीने करतात. त्याचे जेवण आणि हौसमौज सुद्धा आवडीने करतात. अगदी आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्याचे सर्व हट्ट पुरवतात. अश्याच लाडक्या प्राण्याबद्दल आज निबंध लिहिणार आहोत.

चला तर मग सुरू करूयात…

माझा आवडता प्राणी – कुत्रा (My favorite pet animal essay in marathi)

मला सर्वच पाळीव प्राणी खूप आवडतात. परंतु, कुत्रा हा माझा सर्वात आवडता प्राणी आहे. आमच्या घरीदेखील एक कुत्रा आम्ही पाळला आहे. आम्ही त्याला लाडाने टॉमी म्हणून हाक मारतो. टॉमी अशी हाक मारताच तो घरात जिथे कुठे असेल तिथून लगेच समोर येऊन उभा राहतो.

कुत्रा हा सर्वात प्रामाणिक असतो असे म्हंटले जाते. एक वेळ माणूस तुम्हाला धोका देईल पण कुत्रा नाही असे देखील म्हंटले जाते. कुत्रा त्याच्या मालकाची आणि मालकाच्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेतो. जर कोणी अनोळखी माणूस वाटला तर लगेच त्यावर भुंकतो आणि आपल्या मालकाला सतर्क करतो. आमचा टॉमी सुद्धा असाच आहे. टॉमीला जरा जरी संशय आला तरी तो एक विशिष्ट प्रकारे भुंकतो. त्यामुळे, आम्हाला लगेच समजते की कोणीतरी अनोळखी माणूस घराजवळ आला आहे.

आम्ही सुध्दा टॉमी वर खूप प्रेम करतो. त्याचे प्रत्येक लाड पुरवतो. त्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी मी बाहेर फिरायला घेऊन जातो. आम्ही टॉमी ला आणले तेव्हा तो अगदी लहान होता आता तो ५ वर्षांचा झाला आहे. त्याचा प्रत्येक वाढदिवस आम्ही
धुमधडाक्यात साजरा करतो.

टॉमीला मी रोज काही ना काहीतरी शिकवतो. मी त्याला शेक हँड करायला, धावायला आणि उडी मारायला देखील शिकवले आहे. रोज मी शाळेत गेलो की टॉमी माझी चातकासारखी वाट पाहत असतो आणि मी दिसताच माझ्यासोबत खेळू लागतो.

अशाप्रकारे, टॉमी हा आमच्या घरात एक सदस्य म्हणून वावरत राहतो. माझा टॉमी मला खूप आवडतो.

हे पण वाचा

माझा आवडता ऋतू – पावसाळा | पावसाळा निबंध | Rainy Season Essay In Marathi

My favorite sport essay in marathi | माझा आवडता खेळ निबंध

Leave a Comment