मुळ्याचे थालीपीठ | Mulyache Thalipeeth Recipe In Marathi

नमस्कार मित्रांनो,आज आपण पाहणार आहोत मुळ्याचे थालीपीठ बनवण्याची रेसिपी – Mulyache Thalipeeth Recipe In Marathi मराठीतून. माघील लेखात आपण काकडीचे थालीपीठ कसे करावे ते पाहिले या लेखात आपण मुळ्याचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य – Mulyache Thalipeeth Ingredients In Marathi आणि मुळ्याचे थालीपीठ बनवण्याची कृती – Mulyache Thalipeeth Making Process In Marathi हे सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूयात

मुळ्याचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य | Mulyache Thalipeeth Ingredients In Marathi

 • २ मुळे
 • धने पावडर
 • जिरे
 • गव्हाचे पीठ -२ वाटी
 • तीळ
 • हळद
 • अर्धी वाटी तूप
 • आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट १ चमचा (आवडीनुसार कमी जास्त हिरवी मिरची टाकणे )
 • कोथिंबीर
 • मीठ
 • थालीपिठं बनवन्यासाठी थोडे तेल
 • एक छोटा कांदा
Mulyache Thalipeeth Recipe In Marathi
Mulyache Thalipeeth Recipe In Marathi

मुळ्याचे थालीपीठ बनवण्याची कृती | Mulyache Thalipeeth Making Process In Marathi

सर्वप्रथम आपण २ वाटी गहू पीठ घेऊ त्यात तीळ, धने पावडर , जिरे , हळद, एक छोटा  कांदा  बारीक चिरून टाकू ,आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट टाकू तसेच कोथिंबीर टाकू व मीठ चवीनुसार टाकूया .सगळ्यात शेवटी २ मुळे धुवून किसून आपण त्या वरील मिश्रणात टाकूया आणि हे सर्व मिश्रण पाणी टाकून मळून घेऊ नंतर थोडे तेल लावून मळून घेऊ व १० मिनिटे ठेऊ .

नंतर गॅस वर तवा  ठेवावा व आता थालीपीठ मिश्रणाचा एक गोळा पोळपाटावर ठेऊन पोळीच्या आकाराचे लाटून घेऊन तव्यावर टाकावे व बारीक गॅस वर खमंग भाजून घेऊन थालीपीठच्या दोन्ही बाजूने तूप लावावे व मुळ्याचे थालीपीठ खाण्यास वाढावे .हे आपण थालीपीठ दही ,रायता ,लोणचे यासोबत खाऊ शकतो .

Leave a Comment