मराठी पत्रलेखन परिचय | Marathi Patra Lekhan Introduction

मित्रांनो ,आज आपण मराठी पत्रलेखन (Marathi Patra Lekhan) कसे असावे किंवा मराठी पत्र कसे लिहावे हे समजून घेणार आहोत.आपण सर्वांना हे माहितीच असेल कि मराठी पत्रलेखन हा विषय किती महत्त्वाचा आहे.आज इयत्ता १ ते १५ पर्यन्त सर्वांना पत्रलेखन हा भाग मराठी विषयात असतो. तसेच प्रत्येक स्पर्धापरीक्षां मध्ये पत्रलेखनासंबंधी प्रश्न विचारले जातात. भरपूर जणांना हा भाग खूप अवघड वाटतो. परंतु,पत्रलेखन हा विषय काहीच अवघड असा विषय नाही. 

आपण थोडी मेहनत घेतली आणि समजून घेतले तर पत्रलेखन हे आपणांस अगदी सहज समजू शकते. आपण या ब्लॉग मध्ये पत्रलेखन आणि त्याचे प्रकार समजून घेणार आहोत.

पत्रलेखनाचे मुख्यतः २ प्रकार असतात 

१. औपचारिक पत्रे 

२. अनौपचारिक पत्रे 

१. औपचारिक पत्रे :

जे पत्र आपण सरकारी / खाजगी कार्यालय यांना लिहितो ते पत्र औपचारिक पत्रांमध्ये मोडतात. 

हे पत्र आपण सरकारी कर्मचारी किंवा कार्यलय यांना लिहीत असल्यामुळे हि पत्रे थोडक्यात पण यॊग्य विषयास हात घालून लिहायची असतात. या मध्ये कुठेही कार्यालय तसेच कर्मचारी यांचा अपमान होता कामा नये याचाही भान ठेवावं लागत. 

काही उदाहरणे :

औपचारिक पत्रांचे स्वरूप | Aupcharik patra lekhan format

औपचारिक पत्रांचे स्वरूप हे खालील प्रमाणे असावे :

प्रति,
[ व्यक्तीचे नाव (ज्याला पत्र लिहितो आहे ) ] 
[ व्यक्तीचे पद ] 
[ कार्यालय पत्ता ] 
[ दिनांक ]
                                             विषय  : [ पत्राचा विषय थोड्यक्यात ]
महोदय,                                             [ पत्राचा मजकूर सविस्तर ]


                                                   आपला कृपाभिलाषी,
                                                   [ तुमचे नाव ]
                                                   [ तुमचा पत्ता ]
औपचारिक पत्रांचे स्वरूप

२. अनौपचारिक पत्रे :

आपले कुटुंबीय किंवा आप्तेष्ठ यांना लिहिलेले पत्रे म्हणजे अनौपचारिक पत्रे होय. हि पत्रे आई, वडील, भाऊ ,बहीण ,मित्र परिवार यांना संबोधित करून लिहिली जातात. 

हि पत्रे कौटुंबिक असल्यामुळे यात आपुलकी असते. विषय सविस्तरपने मांडले जातात. थोडक्यात कौटुंबिक पत्र लेखन कसे करावे ते आपण पाहुयात .

काही उदाहरणे :

अनौपचारिक पत्रांचे स्वरूप | Anaupcharik patra lekhan format

अनौपचारिक पत्रांचे स्वरूप ( मित्राला पत्र ) हे खालील प्रमाणे असावे :

प्रति,
[ व्यक्तीचे नाव (ज्याला पत्र लिहितो आहे ) ] 
[ व्यक्तीचा घरचा पत्ता ] 
[ दिनांक ]
प्रिय मित्र [ मित्राचे नाव ],


                                 [ पत्राचा मजकूर सविस्तर ]


                                                   तुझा प्रिय मित्र,
                                                   [ तुमचे नाव ]
अनौपचारिक पत्रांचे स्वरूप

पत्रलेखनाचे प्रकार किती व कोणते ?

पत्रलेखनाचे मुख्यतः २ प्रकार असतात 
१. औपचारिक पत्रे 
२. अनौपचारिक पत्रे 

औपचारिक पत्रे म्हणजे काय ?

जे पत्र आपण सरकारी / खाजगी कार्यालय यांना लिहितो ते पत्र औपचारिक पत्रांमध्ये मोडतात. 

अनौपचारिक पत्रे म्हणजे काय ?

आपले कुटुंबीय किंवा आप्तेष्ठ यांना लिहिलेले पत्रे म्हणजे अनौपचारिक पत्रे होय. हि पत्रे आई, वडील, भाऊ ,बहीण ,मित्र परिवार यांना संबोधित करून लिहिली जातात. 

Leave a Comment