मकर संक्रांत निबंध | Makar Sankranti Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण मकर संक्रांत या सणावर निबंध (Makar Sankranti Essay In Marathi) पाहणार आहोत. मित्रांनो, मकर संक्रांत हा सण आपल्या देशात विविध राज्यामध्ये साजरा केला जातो. फक्त या सणाला प्रत्येक राज्यात वेगळ्या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रात हा सण मकर संक्रांत या नावाने ओळखला जातो. चला तर मग मकर संक्रांत या सणाविषयी अधिक माहिती घेऊयात.

दरवर्षी मकर संक्रांत हा सण १४ किंवा १५ जानेवारीला साजरा केला जातो. या दिवशी तीळ-गुळाचे लाडू वाटले जातात आणि ” तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला ” असे म्हटले जाते. या दिवशी आपल्या जवळच्या लोकांना आणि नातेवाईकांना हा तिळाचा लाडू वाटला जातो.

मकर संक्रांतीपासून उत्तरायण चालू होते. उत्तरायण मधील हा काळ फारच शुभ मानला जातो. या दिवशी महिला हळदी-कुंकू चा कार्यक्रम करतात. तसेच, लहान मुले आणि मोठी माणसे या दिवशी पतंग उडवितात.

हा सण साजरा करण्यामागे एक आख्यायिका प्रसिध्द आहे. असे म्हंटले जाते की फार फार वर्षांपूर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो राक्षस लोकांना फार त्रास द्यायचा. त्या त्रासातून लोकांना मुक्त करण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि संकारसुराचा वध केला.

भारतात अनेक सण विविध पध्दतीने साजरे केले जातात आणि त्यामध्ये मकर संक्रांत हा सण विशेष ठरतो.

Makar Sankranti Essay In Marathi

Leave a Comment