Top 12 Low Investment business ideas in Marathi | १२ व्यवसाय मराठी यादी

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत १२ असे व्यवसाय म्हणजेच Low Investment business ideas in Marathi जे तुम्ही अगदी घरातून (Gharguti business ideas) किंवा तुमच्या गावातून (village business ideas) सुरु करू शकता आणि भरपूर पैसे कमाऊ शकता.या पोस्ट मध्ये आपण कमी गुंतवणुकीतून कोणते व्यवसाय करू शकतो तसेच ऑनलाईन अर्निंग ( online earning business ideas) सुद्धा पाहणार आहोत.

या पोस्ट मधून महिलांसाठी घरगुती व्यवसाय (Small Business ideas in Marathi for ladies) तसेच लघु व्यवसाय याबद्दल माहिती घेणार आहोत.चला तर मग कोणते असे व्यवसाय आहेत ते आपण सविस्तरपणे पाहुयात.

Low Investment business ideas in Marathi | कमी पैशात सुरु होणारे व्यवसाय माहिती

Low Investment business ideas in Marathi
Low Investment business ideas in Marathi

जर तुम्हाला तुमचा स्वतःचा असा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही तो कमी पैशात किंवा कमी जागेत सुद्धा करू शकता. या साठी आम्ही व्यवसायांची यादी देत आहोत जे खरंच तुम्हाला उपयोगी येतील.

१. ब्लॉगिंग । Earn Money From Blogging

जर तुम्हाला ब्लॉगिंग करायची असेल तर तुम्ही ती अगदी मोफत सुद्धा करू शकता. गूगल ची Blogger सर्विस वापरून तुम्ही फ्री मध्ये ब्लॉगिंग करू शकता. जर तुम्हाला एखाद्या विषयावर माहिती असेल आणि तुम्हाला लिहिण्याची आवड असेल तर तुमच्या साठी हा ऑनलाईन पर्याय उत्तम आहे.

२. युट्युब । Earn Money From YouTube

मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल कि युट्युब वरून पण आपण पैसे कमाऊ शकतो, तर हो हे खर आहे. त्यासाठी तुम्हाला युट्युब वर अकाउंट उघडून,तुमच्या आवडत्या विषयावर विडिओ बनवून अपलोड करायचे आहेत. परंतु, जर तुम्हाला या माध्यमातून पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला पात्र व्हावं लागेल. पात्र होण्यासाठी तुम्हाला ४००० तासांचा वॉच टाईम आणि १००० सबस्क्रायबर १ वर्षात करावे लागतील.

युट्युब वर विडिओ टाकण्यासाठी तुमच्यात एखाद्या विषयात कौशल्य पाहिजे आणि तुम्हाला`त्याची आवड सुद्धा पाहिजे तरच तुम्ही त्या विषयावर अनेक व्हिडिओस अपलोड करू शकता आणि युट्युब अटींवर पात्र होऊ शकता.आणि सर्वात महत्वाच म्हणजे विडिओ अपलोड करणे हे अगदी मोफत आहे. त्यामुळे, आताच तुमचा चॅनेल उघडा आणि पैसे कमवा.

३ . अफिलिएट मार्केटिंग | Affiliate Marketing

जर तुमच्याकडे आधीपासूनच तुमची स्वतःची वेबसाईट अथवा युट्युब चॅनेल किंवा फेसबुक पेज आहे, तर तुम्ही अफिलिएट मार्केटिंगद्वारे सुद्धा पैसे कमाऊ शकता. जेव्हा तुम्ही एखादी वस्तू किंवा सेवा विकता आणि त्याबद्दल कमिशन घेता त्याला अफिलिएट मार्केटिंग म्हणतात.

amazon, flipkart किंवा अशा अनेक ईकॉमर्स वेबसाईट तुम्हाला ही संधी देतात. त्यांच्या वस्तूंची लिंक तुम्ही तुमच्या वेबसाईट वर टाकू शकता आणि त्या विकून त्याच कमिशन घेऊ शकता. परंतु, यासाठी तुम्हाला त्यांच्या वेबसाईट वर रेजिस्ट्रेशन करावे लागते.

जर तुम्हाला एखादी सेवा विकायची असेल तर Udemy सारख्या वेबसाईट चे कोर्सेस तुम्ही विकून पैसे कमाऊ शकता. मी अफिलिएट मार्केटिंग या विषयावर संपूर्ण लेख लिहिला आहे तो तुम्ही वाचू शकता.

४. घरगुती पोळी भाजी केंद्र | Home Canteen Business Idea In Marathi

अनेक मुले ही उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरांमध्ये जातात तेथे त्यांना जेवणाची सोय नसते. त्यांची तीच गरज ओळखून तुम्ही घरगुती पोळी भाजी केंद्र सुरु करू शकता आणि कमी किंमतीत चांगले जेवण पुरवू शकतात.जर तुम्ही महिला असाल आणि उत्तम स्वयंपाक बनवत असाल तर हा उद्योग तुम्ही नक्कीच करू शकता.

५. घरगुती ट्युशन क्लासेस । Home Tuition Classes Business Idea In Marathi

हा व्यवसाय सुद्धा कमी पैशात सुरु होणारा व्यवसाय आहे (Low Investment business ideas in Marathi)

जर तुमची पदवी झाली असेल आणि तुम्हाला जॉब मिळत नसेल किंवा काही कारणास्तव तुम्ही तो करू शकत नसाल तर तुम्ही घरगुती ट्युशन क्लासेस घेऊ शकता आणि चांगले पैसे कमाऊ शकता. परंतु, त्यासाठी तुमच्याकडे शिकवण्याचे कौशल्य असले पाहिजे.

६. किराणा दुकान व्यवसाय | Grocery Shop Business Idea In Marathi

तुम्ही जर तुमच्या आसपास पाहिले तर तुम्हाला नक्कीच ३-४ किराणा शॉप्स दिसतील कारण घरात लागणाऱ्या गरजेच्या वस्तू तुम्ही किराणा दुकानातूनच विकत आणता. म्हणूनच, किराणा दुकान उघडणे हे बऱ्यापैकी फायदेशीर ठरते. परंतु , त्याआधी तुम्ही आधी मार्केट रिसर्च करा आणि पहा तुम्ही जेथे दुकान उघडता आहात तिथे आसपास किती दुकान आहेत आणि तिथे बऱ्यापैकी लोक राहतात कि नाही. या गोष्टी बघूनच तुम्ही या व्यवसायात या.

७. इव्हेंट मॅनेजमेंट । Event Management Business Idea In Marathi

मित्रांनो, आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाला कार्यक्रमाचे व्यवस्थापन स्वतःला करणे जमत नाही. हाच फायदा तुम्ही उचलू शकता.जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाचे डेकोरेशन, व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येत असेल आणि यात तुम्हाला रस असेल तर हा उद्योग तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरवू शकतो.

या व्यवसायात तुम्हाला अजून एक फायदा असा आहे कि तुम्ही त्याच वस्तू पुन्हा वापरू शकता म्हणजेच तुमचे पैसे वाचतील. या व्यवसायात तुम्ही अनेक कार्यक्रम आयोजित करू शकता.

८. ब्युटी पार्लर व्यवसाय । Beauty Parlor Business Idea In Marathi

जर तुम्ही महिला आहात आणि तुम्हाला या विषयात थोडी माहिती असेल तर हा नक्कीच चांगला पर्याय ठरू शकतो. कारण, आज अनेक महिला हा व्यवसाय करून बक्कळ पैसे कमावत आहेत.

तुम्ही जर शहरात किंवा गावात राहत असाल तर तुमच्या आसपास राहणाऱ्या महिलांना तुमच्या व्यवसायाबद्दल सांगू शकता. तसेच, लग्न, साखरपुडा अशा कार्यक्रमासाठी ऑर्डर घेऊ शकतात.जर तुमच्याकडे शॉप असेल तर आणखी चांगले अन्यथा घरातून सुद्धा तुम्ही हा उद्योग चालू करू शकता.

९. मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय | Candle Making Business Idea In Marathi

मेणबत्ती बनवणे हा एक लघु उद्योग आहे. जर तुम्ही गावात राहत असाल तर हा उद्योग जास्त फायदेशीर आहे कारण तुम्हाला माहीतच आहे गावांमध्ये जास्त लोडशेडींग होत असते त्यामुळे तेथे हा उद्योग जोरात चालू शकतो.

तसेच रंगीबेरंगी मेणबत्त्या बनवून तुम्ही त्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन विकू शकता. जर तुम्हाला या व्यवसायात कोणता कच्चा माल लागतो ते माहित करायचे असेल तर तुम्ही indiamart किंवा tradeindia सारख्या वेबसाईट ला भेट देऊ शकतात.

१०. स्टेशनरी व्यवसाय | Stationary Business Idea In Marathi

मित्रांनो, स्टेशनरी व्यवसाय हा low investment business मध्ये मोडतो. जर तुमच्याकडे कमी भांडवल असेल तर तुम्ही नक्कीच या पर्यायाचा विचार करू शकता. हा व्यवसाय जर तुम्ही शाळा, कॉलेजेस यांच्या जवळ टाकलात तर उत्तम आहे. या व्यवसायात तुम्ही शाळेत लागणारे सर्व सामान ठेऊ शकतात आणि चांगले पैसे कमाऊ शकतात.

तसेच, तुम्ही फोटोकॉपी काढणारी मशीन ठेवलीत तर आणखी उत्तम! कारण, शाळा आणि कॉलेज मध्ये मुलांना नेहमीच फोटोकॉपी काढावी लागते. त्यामुळे, हा पर्याय तुम्हाला फायदेशीर ठरेल.

११. पेपरप्लेट बनवण्याचा व्यवसाय | Paper Plate Making Business In Marathi

तुम्ही शहरात किंवा गावात राहत असाल तर हा व्यवसाय सुद्धा तुम्ही सुरु करू शकता. मित्रांनो, जवळपास प्रत्येक कार्यक्रमात पेपरप्लेट लागतेच आणि म्हणून पेपरप्लेट ची मागणी ही नेहमीच जास्त असते. जर तुम्ही पेपरप्लेट बनवायची मशीन लावली आणि तयार माल विकण्यासाठी मार्केटिंग केलीत तर हा उद्योग सुद्धा फायदेशीर ठरू शकतो.

ह्या उद्योगाबद्दल तुम्हाला माहिती हवे असेल म्हणजेच तुम्हाला संबंधित मशीन कोणती, कच्चा माल कोठे भेटतो याची माहिती हवी असेल तर या संबंधी मी एक लेख लिहिला आहे तो तुम्ही वाचू शकता.

१२. गिफ्ट शॉप व्यवसाय । Gift Shop Business Idea In Marathi

आजच्या काळात प्रत्येकाला भेटवस्तू देणे आणि घेणे हे दोन्ही आवडते. जर कोणाचा वाढदिवस असेल किंवा लग्नाचं रेसेपशन असेल तर आपण भेटवस्तू घेतल्या शिवाय जात नाही.

या शॉप मध्ये तुम्ही अनेक भेटवस्तू, ग्रीटिंग कार्ड तसेच घरगुती गेम्स ठेऊ शकतात आणि चांगले पैसे कमाऊ शकतात. त्यामुळे, हा सुद्धा व्यवसाय फायदेशीर ठरतो.

अशा पद्धतीने मी तुम्हाला काही Low Investment business ideas in Marathi सांगितले.तुम्ही सुद्धा व्यवसाय सुरु करण्याआधी मार्केट रिसर्च नक्की करा. म्हणजे तुम्हाला नक्की कोणता व्यवसाय करणं चांगल होईल ते समजेल.जर तुम्हाला आणखी Low Investment business ideas in Marathi पाहिजे असतील तर मला नक्की कंमेंट करून कळवा. धन्यवाद !

Note : कोणताही व्यवसाय चालू करताना त्यातील तज्ञ मंडळींचा सल्ला जरूर घ्या. तसेच व्यवसाय चालू करण्याआधी मार्केट रिसर्च जरूर करा.व्यवसाय हा तुम्ही तुमच्या जोखमीवर करा. devanagrimarathi.com ची टीम किंवा लेखक फायदा अथवा नुकसानाला जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी. धन्यवाद !!!

Leave a Comment