लिंग आणि वचन | Ling Ani Vachan In Marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातील अत्यंत महत्वाचा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे लिंग आणि वचन.
लिंग म्हणजे काय ? त्याचे प्रकार किती व कोणते ? तसेच वचन म्हणजे काय? त्याचे प्रकार किती व कोणते?हे सर्व आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत.

लिंग म्हणजे काय?


नामाच्या रूपावरून एखादी वस्तू सजीव किंवा निर्जीव किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशी पुरुष वर्गातील किंवा स्त्री वर्गातील आहे ,किंवा या दोन्ही वर्गापैकी एकही वर्गातील नाही ,अशे असण्याच्या नामाच्या रुपाला लिंग असे म्हणतात.

लिंगाचे प्रकार किती व कोणते?

लिंगाचे एकूण ३ प्रकार पडतात ,ते पुढीलप्रमाणे

१) पुल्लींग
२) स्त्रीलिंग
३) नपुसकलिंग

१) पुल्लींग –

नामाच्या रुपावरुन पुरुष वर्गाचा बोध होत असेल ,किंवा नामावरून पुरुष जातीचे गुणधर्म दिसुन येत असेल ,तर त्या नावाचे किंवा नामाचे लिंग पुल्लींग असते.

पुरुष जातीचे गुणधर्म जसे कि कठोरपणा ,शक्ती ,राकटपणा इ.

२) स्रीलिंग-

नामाच्या रुपावरुन स्री वर्गाचा बोध होत असेल ,किंवा नामावरून स्री जातीचे गुणधर्म दिसुन येत असेल ,तर त्या नावाचे किंवा नामाचे
लिंग स्रीलिंग असते.

स्री जातीचे गुणधर्म जसे कि कोमलपणा,देखणेपणा ,चंचलपणा ,हळुवारपणा इ.

३) नपुसकलिंग –

नामाच्या रुपावरुन स्री किंवा पुरुष या दोंघांपैकी कोणत्याही वर्गाचा बोध होत नसेल ,किंवा नामावरून स्री किंवा पुरुष जातीचे गुणधर्म दिसुन येत नसेल ,तर त्या नावाचे किंवा नामाचे लिंग नपुसकलिंग असते.

उदा. ते मुल ,ते रान ,ते पान इ.

वचन म्हणजे काय?

नावाचे किंवा नामाचे ते सजीव असो कि निर्जीव त्यांची संख्या सुचवण्याचा गुणधर्म असतो त्याला वचन असे म्हणतात.

वचनांचे प्रकार किती व कोणते?

वचनांचे २ प्रकार पडतात ,ते पुढीलप्रमाणे
१) एकवचन
२) अनेकवचन

१) एकवचन –

नामाच्या किंवा नावाच्या रुपावरुन एकाच वस्तूचा गुणधर्म दिसत असेल किंवा तसे दर्शवण्यात येत असेल तर
ते नाव किंवा नाम एकवचन होते.

उदा. पुस्तक ,गाय ,झाड ,मुलगा ,बाई ,फळा इ.

२) अनेकवचन –

नामाच्या किंवा नावाच्या रुपावरुन एकापेक्षा जास्त वस्तूंचा गुणधर्म दिसत असेल किंवा तसे दर्शवण्यात येत असेल तर
ते नाव किंवा नाम अनेकवचन होते.

उदा. झाडे,फळे इ.

लिंग म्हणजे काय?

नामाच्या रूपावरून एखादी वस्तू सजीव किंवा निर्जीव किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशी पुरुष वर्गातील किंवा स्त्री वर्गातील आहे ,किंवा या दोन्ही वर्गापैकी एकही वर्गातील नाही ,अशे असण्याच्या नामाच्या रुपाला लिंग असे म्हणतात.

लिंगाचे प्रकार किती व कोणते?

लिंगाचे एकूण ३ प्रकार पडतात.
१) पुल्लींग
२) स्त्रीलिंग
३) नपुसकलिंग

वचन म्हणजे काय?

नावाचे किंवा नामाचे ते सजीव असो कि निर्जीव त्यांची संख्या सुचवण्याचा गुणधर्म असतो त्याला वचन असे म्हणतात.

वचनांचे प्रकार किती व कोणते?

वचनांचे २ प्रकार पडतात.
१) एकवचन
२) अनेकवचन

Leave a Comment