कुरकुरीत भजी रेसिपी | Kurkurit Bhaji Recipe In Marathi

नमस्कार मित्रांनो,आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत भजी बनवण्याची रेसिपी – Kurkurit Bhaji Recipe In Marathi मराठीतून. माघील रेसिपी लेखात आपण कोथिंबीरचे थालीपीठ कसे करावे ते पाहिले या लेखात आपण कुरकुरीत भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – Kurkurit Bhaji Ingredients In Marathi आणि कुरकुरीत भजी बनवण्याची कृती – Kurkurit Bhaji Making Process In Marathi हे सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूयात.

कुरकुरीत भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य | Kurkurit Bhaji Ingredients In Marathi

  • बेसन पीठ १ वाटी
  • ओवा पाव चमचा
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर
  • खाण्याचा सोडा पाव चमचा
  • तळण्यासाठी तेल

कुरकुरीत भजी बनवण्याची कृती | Kurkurit Bhaji Making Process In Marathi

Kurkurit Bhaji Recipe In Marathi
Kurkurit Bhaji Recipe In Marathi

सर्वप्रथम आपण बेसन पीठ १ वाटी घेऊ त्यात पाव चमचा ओवा टाकूया ओवा टाकताना तो हाताने चोळून घेऊ त्यामुळे ओव्याचा स्वाद भजींना छान येतो नंतर त्यात चवीनुसार मीठ टाकूया व कोथींबीर पण टाकूया नंतर हे मिश्रण आपण पाण्याने भिजवून घेऊ ते जास्त घट्ट करू नये नंतर सगळ्यात शेवटी खाण्याचा सोडा पाव चमचा टाकून घेऊ व मिश्रण एका दिशेने १० मिनिटे कालवून घेऊ.

आता कढईत तेल तापत ठेऊ गॅस मध्यम आचेवर ठेऊ व तेल तापले कि त्यात वरील मिश्रणाचे गोळे चमच्याने किंवा हाताने सुपारी एवढे गोळे टाकू व भजी तळून घेऊ. भजी आपण चिंचेची चटणी किंवा पुदिन्याची चटणी यासोबत खाऊ.

Leave a Comment