क्रियापद म्हणजे काय ? | Kriyapad Mhanaje Kay? | Marathi Vyakaran

नमस्कार मित्रांनो, माघील एका लेखा मध्ये आपण शब्दाच्या जाती पाहिल्यात. आज आपण मराठी व्याकरणातील ( Marathi Grammar ) अत्यंत महत्वाचा विषय पाहणार आहोत. क्रियापद म्हणजे काय ( Kriyapad Mhanaje Kay ) तसेच त्याची उदाहरणे पाहणार आहोत.

क्रियापद म्हणजे काय ? | Kriyapad Mhanaje Kay

वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या तसेच वाक्याचा अर्थ ज्या शब्दामुळे पूर्ण होतो अशा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.क्रियापद हे विकारी शब्दात मोडले जाते.

क्रियापद म्हणजे नक्की काय हे अभ्यासण्यासाठी आपण काही उदाहरणे पाहुयात.

उदाहरणार्थ :

१) सुरेश कबड्डी खेळतो.
वरील वाक्यात खेळतो या शब्दाने खेळण्याची क्रिया दर्शवली आहे. तसेच खेळतो हा शब्द वाक्याचा अर्थ सुद्धा पूर्ण करतो.

२) मी खेळायला जातो.
वरील वाक्यात जातो या शब्दाने जाण्याची क्रिया दर्शवली आहे. तसेच जातो हा शब्द वाक्याचा अर्थ सुद्धा पूर्ण करतो.

३) रोहनने बक्षीस जिंकले.
वरील वाक्यात जिंकले या शब्दाने जिंकण्याची क्रिया दर्शवली आहे. तसेच जिंकले हा शब्द वाक्याचा अर्थ सुद्धा पूर्ण करतो.

क्रियापद म्हणजे काय ?

वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या तसेच वाक्याचा अर्थ ज्या शब्दामुळे पूर्ण होतो अशा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.

Leave a Comment