कोथिंबीरचे थालीपीठ | Kothimbir Thalipeeth Recipe In Marathi

नमस्कार मित्रांनो,आज आपण पाहणार आहोत कोथिंबीरचे थालीपीठ बनवण्याची रेसिपी – Kothimbir Thalipeeth Recipe In Marathi मराठीतून. माघील लेखात आपण बीटचे थालीपीठ कसे करावे ते पाहिले या लेखात आपण कोथिंबीरचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य – Kothimbir Thalipeeth Ingredients In Marathi आणि कोथिंबीरचे थालीपीठ बनवण्याची कृती – Kothimbir Thalipeeth Making Process In Marathi हे सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूयात.

कोथिंबीरचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य | Kothimbir Thalipeeth Ingredients In Marathi

  • बाजरी पीठ २ वाटी
  • कोथिंबीर
  • जिरे
  • गव्हाचे पीठ १ /२ वाटी
  • तीळ
  • हळद
  • अर्धी वाटी तूप
  • आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट १ चमचा (आवडीनुसार कमी जास्त हिरवी मिरची टाकणे )
  • मीठ
  • थालीपिठं बनवन्यासाठी थोडे तेल
  • एक छोटा कांदा
Kothimbir Thalipeeth Recipe In Marathi
Kothimbir Thalipeeth Recipe In Marathi

कोथिंबीरचे थालीपीठ बनवण्याची कृती | Kothimbir Thalipeeth Making Process In Marathi

सर्वप्रथम आपण गहू आणि बाजरी पीठ घेऊ त्यात तीळ,  जिरे , हळद, एक छोटा  कांदा  बारीक चिरून टाकू आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट टाकू  व मीठ चवीनुसार टाकूया .सगळ्यात शेवटी एक वाटी कोथिंबीर चिरून,धुवून घेऊ आणि त्या वरील मिश्रणात टाकूया आणि हे सर्व मिश्रण पाणी टाकून मळून घेऊ नंतर थोडे तेल लावून मळून घेऊ व १० मिनिटे ठेऊ.

नंतर गॅस वर तवा ठेवावा व थोडे तेल पूर्ण तव्यावर पसरावे नंतर पाणी हाताला लावून थालीपीठ मिश्रणाचा गोळा घेऊन तो तव्यावर हाताने थापावा दोन्ही बाजूने ते लालसर होईपर्यंत शेकावे, आपण ते रुमाल ओला करून त्यावर थालीपीठ मिश्रणाचा गोळा घेऊन तो थापून मग तव्यावर थालीपीठ असणारी बाजू तव्यावर टाकावी व अलगद रुमाल दोन्ही हातांनी काढून घेऊ.

आपण हे थालीपीठ दही ,रायता ,लोणचे यासोबत खाऊ शकतो .

Leave a Comment