काकडीचे थालीपीठ | Kakdi Thalipeeth Recipe In Marathi

नमस्कार मित्रांनो,आज आपण पाहणार आहोत काकडीचे थालीपीठ बनवण्याची रेसिपी – Kakdi Thalipeeth Recipe In Marathi मराठीतून. माघील लेखात आपण दुधी भोपळ्याचे थालीपीठ कसे करावे ते पाहिले या लेखात आपण काकडीचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य – Kakdi Thalipeeth Ingredients In Marathi आणि काकडीचे थालीपीठ बनवण्याची कृती – Kakdi Thalipeeth Making Process In Marathi हे सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूयात…

काकडीचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य | Kakdi Thalipeeth Ingredients In Marathi

  • पाव किलो काकडी
  • गव्हाचे पीठ -१ वाटी
  • बाजरी पीठ -१ वाटी
  • ज्वारी पीठ -१ वाटी
  • बेसन पीठ – २ चमचे
  • २ छोटे चमचे रवा
  • १ चमचा शेंगदाण्याचा कूट
  • आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट १ चमचा (आवडीनुसार कमी जास्त हिरवी मिरची टाकणे )
  • कोथिंबीर
  • मीठ
  • थालीपिठं बनवन्यासाठी थोडे तेल
  • एक छोटा कांदा
Kakdi Thalipeeth Recipe In Marathi
Kakdi Thalipeeth Recipe In Marathi

काकडीचे थालीपीठ बनवण्याची कृती | Kakdi Thalipeeth Making Process In Marathi

सर्वप्रथम आपण १ वाटी गहू पीठ, १ वाटी बाजरी पीठ, १ वाटी ज्वारी पीठ, २ चमचे बेसन पीठ, २ चमचे रवा, १ चमचा शेंगदाण्याचा कूट हे सर्व एकत्र घेऊ त्यानंतर आपण त्यात एक छोटा कांदा बारीक चिरून टाकू. त्यानंतर, आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट टाकू तसेच कोथिंबीर टाकू व मीठ चवीनुसार टाकूया.

सगळ्यात शेवटी पाव किलो काकडी धुवून किसून आपण त्या वरील मिश्रणात टाकूया आणि हे सर्व मळून घेऊ हे पीठ थोडे सैलसरच मळावे गरजेनुसार पाणी टाकावे व पीठ सैलसर मळावे.

नंतर गॅस वर तवा ठेवावा व थोडे तेल पूर्ण तव्यावर पसरावे नंतर पाणी हाताला लावून थालीपीठ मिश्रणाचा गोळा घेऊन तो तव्यावर थापावा दोन्ही बाजूने ते लालसर होईपर्यंत शेकावे ,आपण ते रुमाल ओला करून त्यावर थालीपीठ मिश्रणाचा गोळा घेऊन तो थापून मग थालीपीठ असणारी बाजू तव्यावर टाकावी व अलगद रुमाल दोन्ही हातांनी काढून घेऊ. आपण हे थालीपीठ दही, रायता, लोणचे यासोबत खाऊ शकतो.

Leave a Comment