Internet banking information in Marathi | इंटरनेट बँकिंगबद्दल संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो, आज आपण Internet banking information in Marathi म्हणजेच इंटरनेट बँकिंगबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.

मित्रांनो, या लेखात आपण what is Internet banking in marathi म्हणजेच इंटरनेट बँकिंग म्हणजे काय? तसेच what are the benefits of internet banking म्हणजेच इंटरनेट बँकिंगचे फायदे कोणते? आणि What are the Important things should considered while doing internet banking म्हणजेच इंटरनेट बँकिंग वापरतांना कोणत्या महत्वाच्या गोष्टींचा विचार केला पाहिजे?

मित्रांनो, इंटरनेट बँकिंग ही एक बॅंकेची ऑनलाईन सुविधा आहे जिचा उपयोग करून आपण आर्थिक किंवा बिगर – आर्थिक व्यवहार करू शकतो. आज जवळपास प्रत्येक सरकारी किंवा खाजगी बँक ही सुविधा देते. यामुळे, ग्राहकांना प्रत्येक लहान लहान कामांसाठी बँकेत जाण्याची गरज भासत नाही.

इंटरनेट बँकिंग संदर्भात आणखी माहिती घेऊयात…

what is Internet banking in marathi | इंटरनेट बँकिंग म्हणजे काय?

मित्रांनो, इंटरनेट बँकिंग ही सुविधा घेण्यासाठी तुम्हाला प्रथम तुमचे खाते असलेल्या बँकेतून इंटरनेट बँकिंग activate करावी लागेल. यासाठी तुम्ही तुमच्या संबंधित बँकेत अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर बँक तुम्हाला एक username आणि password देईल तो वापरून तुम्ही तुमचे खाते असलेल्या बँकेच्या official website वर जाऊन login करू शकता आणि इंटरनेट बँकिंग चा फायदा उचलू शकता.

जर तुमचे इंटरनेट बँकिंग activate असेल तर कोणत्याही आर्थिक किंवा बिगर – आर्थिक कारणासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. इंटरनेट बँकिंग या माध्यमातून तुम्ही पैसे ट्रान्स्फर (money transfer), ऑनलाईन शॉपिंग (online shopping), बँक स्टेटमेंट (bank statement), चेक बॅंक बॅलन्स ( check bank balance) तसेच अशाच अनेक सुविधांचा लाभ घर बसल्या घेऊ शकता. यासाठी तुमच्या बँक खात्यात इंटरनेट बँकिंग activate पाहिजे आणि इंटरनेट असलेले उपकरण म्हणजेच मोबाईल किंवा लॅपटॉप पाहिजे.

what are the benefits of internet banking | इंटरनेट बँकिंगचे फायदे कोणते?

 • पैसे ट्रान्स्फर (money transfer)
 • ऑनलाईन शॉपिंग (online shopping)
 • बँक स्टेटमेंट (bank statement)
 • चेक बॅंक बॅलन्स ( check bank balance)
 • FD किंवा RD
 • पासबुक (passbook)
 • इतर अनेक सुविधा

What are the Important things should considered while doing internet banking | इंटरनेट बँकिंग वापरतांना कोणत्या महत्वाच्या गोष्टींचा विचार केला पाहिजे?

 • तुमचा नेट बँकिंग पासवर्ड कोणासोबतही share करू नका.
 • सायबर कॅफे मधून कधीही इंटरनेट बँकिंग वापरू नका.
 • सार्वजनिक वायफाय कधीही वापरू नका.
 • तुमचा इंटरनेट बँकिंग पासवर्ड strong ठेवा आणि सतत बदलत राहा.
 • मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये antivirus असेल अशाच device मधून लॉगिन करा.

तर मित्रांनो, अशाप्रकारे तुम्ही इंटरनेट बँकिंग वापरून घरच्या घरी अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकता. इंटरनेट बँकिंग ची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. धन्यवाद!!!

Leave a Comment