नूतन वर्षाच्या शुभेच्छा पाठविण्यासाठी आजी – आजोबांस पत्र | Happy New Year letter to Grandfather and Grandmother

मित्रांनो, पत्राचे प्रकार किती व कोणते? हे आपण माघील एका ब्लॉग मध्ये पाहिले.आज आपण पाहुयात नूतन वर्षाच्या शुभेच्छा पाठविण्यासाठी आजी – आजोबांस पत्र कसे लिहावे.

नूतन वर्षाच्या शुभेच्छा पाठविण्यासाठी आजी – आजोबांस पत्र लिहा. | Write a letter to wish Happy new year to Grandfather and Grandmother

प्रति,
तिर्थस्वरूप आजी / आजोबा,
स.न.वि.वि.

नमस्कार आजी / आजोबा, तुम्ही दोघे कसे आहात ? आशा करतो की चांगलेच असाल. इकडे मी आणि आई-पप्पा पण मजेत आहे.

पत्र लिहिण्यास कारण की आता नवीन वर्ष जवळ आले आहे आणि मला कालच पप्पांनी सांगितलं की काही महत्वाच्या कामामुळे तुम्ही अजून ३-४ आठवडे इकडे येऊ शकणार नाहीत म्हणूनच तुम्हाला नवीन वर्षांच्या शुभेच्या पत्राद्वारे द्याव्यात असे वाटले. आजी-आजोबा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!! तुम्हाला येणारे नवीन वर्ष सुख-समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो हीच प्रार्थना.

आजी / आजोबा, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि लवकरात लवकर आम्हाला भेटायला या.

तुझा लाडका नातू,
[ तुमचे नाव ]

Leave a Comment