गुरुपौर्णिमा भाषण | Guru Purnima bhashan in marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण गुरुपौर्णिमा या विषयावर भाषण (Guru Purnima bhashan in marathi) पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला गुरू आणि शिष्य या नात्याची माहिती असेलच परंतु जर तुम्हाला या विषयावर भाषण देण्यास सांगितले तर तुम्ही थोडे विचारात पडाल. म्हणूनच, गुरुपौर्णिमा या विषयावर सविस्तरपणे भाषण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. गुरुपौर्णिमा ही गुरूंविषयी आदर व्यक्त करण्यासाठी केली जाते. गुरूंची महती ही फार मोठी असते. तेच आपण या भाषणातून पाहणार आहोत. चला तर मग पाहुयात, गुरुपौर्णिमा या विषयावर भाषण किंवा स्पीच कसे असावे ते.

Guru Purnima Speech In Marathi / Guru Purnima bhashan in marathi

व्यासपीठावरील सर्व अतिथी, सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. माझे नाव तुषार आहे. मी इयत्ता 8 वी चा विद्यार्थी आहे. आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी तुम्हाला गुरूंचे आपल्या जीवनात किती महत्व आहे हे समजावून सांगणार आहे. कृपया ते नम्रपणे ऐकून घ्यावे ही विनंती.

  गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा 

       गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः

अर्थात, गुरू म्हणजे साक्षात ईश्वर. गुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश.

मित्रांनो, आज १३ जुलै म्हणजेच गुरुपौर्णिमा. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.गुरूंचे महत्त्व हे आपल्या संस्कृती मध्ये अतिउच्च आहे. आई – वडील हे आपले पाहिले गुरू. दुसरे गुरू ते म्हणजे आपले शिक्षक आणि तिसरे गुरू म्हणजे ती प्रत्येक व्यक्ती जी आपल्याला काही ना काही शिकवते. अस नाही की गुरू हा तुमच्यापेक्षा मोठाच असला पाहीजे, कधी कधी लहान मुले सुध्दा तुम्हाला खूप काही शिकवून जातात. तसेच, छोटे छोटे प्राणी कीटक हे सुद्धा तुम्हाला कस जगायचे आणि कसे वागायचे हे शिकवतात.

मित्रांनो, प्रत्येक जण आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतो. फक्त आपल्याला ते ओळखता आले पाहिजे. गुरू हा शिष्याचा मार्गदर्शक असतो. म्हणूनच, गुरू आज्ञा ही पाळली गेली पाहिजे. गुरू हे आपल्या शिष्यावर नेहमीच चांगले संस्कार घडवितात आणि त्याला जीवनात कसे जगायचे आणि कसे लढायचे ते शिकवतात. शिष्याच्या कठीण काळात गुरूंचे उपदेशच मार्गदर्शक ठरतात. कृष्ण-अर्जुन , द्रोणाचार्य-एकलव्य अशा अनेक गुरू शिष्याच्या जोड्या तुम्हाला माहीतच असतील.

अशाप्रकारे, शिष्याला योग्य मार्ग दाखवणाऱ्या गुरूंसाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.

Leave a Comment