माझा आवडता सण – गुढीपाडवा | Gudhipadva essay in marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण माझा आवडता सण – गुढीपाडवा (Gudhipadva essay in marathi) या विषयावर निबंध बघणार आहोत. मित्रांनो, गुढीपाडवा हा मराठी संस्कृती मधील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो.

इंग्रजी महिन्याची सुरुवात जशी १ जानेवारी पासून होते तशीच मराठी महिन्याची सुरुवात ही गुढीपाडवा या सणापासून होते. म्हणजेच,चैत्र महिन्याच्या मराठी महिन्यापासून होते.

गुढीपाडवा या सणात नविन वर्षाचे स्वागत लोक घराबाहेर गुढी उभारून करतात. गुढी उभारण्यासाठी एक उंच काठी किंवा बांबू घेतला जातो. त्यावर, खण किंवा नवी साडी घातली जाते आणि त्याच्यावर चांदीचा / तांब्याचा लोटा ठेवला जातो. निंबाची आणि आंब्याची पाने तसेच झेंडूच्या फुलांचा हार त्यावर घातला जातो.तसेच, गोड साखरेच्या बत्ताशे लावले जातात. अशा पद्धतीने ही गुढी उंच उभारली जाते. त्यानंतर, तिच्या भोवती रांगोळी काढली जाते आणि रीतसर नैवद्य दाखवून पूजा केली जाते.

गुढी उभारण्यामागे अजुन एक आख्यायिका सांगितली जाते. या दिवशी प्रभू रामचंद्र १४ वर्षे वनवास भोगून जेव्हा अयोध्येत आले तेव्हा लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी गुढी उभारली होती. हीच परंपरा आजही गुढी उभारून पाळली जाते. तसेच, ब्रह्मदेवाने याच दिवशी या सृष्टीची रचना केली असेही म्हंटले जाते.

अशाप्रकारे, गुढीपाडवा हा सण सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन साजरा करतात आणि आपल्यातील एकोपा कायम ठेवतात. म्हणूनच, गुढीपाडवा या मराठी सणाचे विशेष महत्त्व आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर जरूर कमेंट करून मला कळवा. धन्यवाद!

Leave a Comment