Site icon देवनागरी मराठी

गिलके (घोसाळी) भजी रेसिपी | Gilke Bhaji Recipe In Marathi

Gilke Bhaji Recipe In Marathi

Gilke Bhaji Recipe In Marathi

नमस्कार मित्रांनो,आज आपण पाहणार आहोत गिलके (घोसाळी) भजी बनवण्याची रेसिपी – Gilke Bhaji Recipe In Marathi मराठीतून. माघील रेसिपी लेखात आपण कुरकुरीत बटाटा भजी कशी करावी ते पाहिले या लेखात आपण गिलके (घोसाळी) भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – Gilke Bhaji Ingredients In Marathi आणि गिलके (घोसाळी) भजी बनवण्याची कृती – Gilke Bhaji Making Process In Marathi हे सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूयात.

गिलके (घोसाळी) भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य | Gilke Bhaji Ingredients In Marathi

गिलके (घोसाळी) भजी बनवण्याची कृती | Gilke Bhaji Making Process In Marathi

सर्वप्रथम आपण बेसन पीठ १ वाटी घेऊ त्यात पाव चमचा ओवा टाकूया ओवा टाकताना तो हाताने चोळून घेऊ त्यामुळे ओव्याचा स्वाद भजींना छान येतो नंतर त्यात चवीनुसार लाल मिरची १ चमचा, हळद अर्धा चमचा व मीठ टाकूया व कोथींबीर पण टाकूया नंतर हे मिश्रण आपण पाणी टाकून मिक्स करून घेऊ नंतर सगळ्यात शेवटी खाण्याचा सोडा पाव चमचा टाकून घेऊ व मिश्रण एका दिशेने १० मिनिटे कालवून घेऊ.

नंतर २ गिलके (घोसाळी) धुवून घेऊ व गोल आकारात पातळ कापून घेऊ. आता कढईत तेल तापत ठेऊ गॅस मध्यम आचेवर ठेऊ व तेल तापले कि एक एक गिलक्याचे काप घेऊ व वरील मिश्रणात बुडवून तेलात टाकू व तळून घेऊ. ही भजी आपण चिंचेची चटणी किंवा पुदिन्याची चटणी यासोबत खाऊ शकतो.

Exit mobile version