दुधी भोपळ्याचे थालीपीठ | Dudhi Bhopla Thalipeeth Recipe In Marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवण्याची रेसिपी – Dudhi Bhopla Thalipeeth Recipe In Marathi मराठीतून. या लेखात आपण दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य – Dudhi Bhopla Thalipeeth Ingredients In Marathi आणि दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवण्याची कृती – Dudhi Bhopla Thalipeeth Making Process In Marathi हे सविस्तरपणे पाहणार आहोत.

चला तर मग सुरु करूयात…

दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य | Dudhi Bhopla Thalipeeth Ingredients In Marathi

 • एक छोटा दुधी भोपळा
 • गव्हाचे पीठ -१ वाटी
 • बाजरी पीठ -१ वाटी
 • ज्वारी पीठ -१ वाटी
 • बेसन पीठ – २ चमचे
 • २ छोटे चमचे रवा
 • १ चमचा शेंगदाण्याचा कूट
 • आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट १ चमचा (आवडीनुसार कमी जास्त हिरवी मिरची टाकणे )
 • कोथिंबीर
 • मीठ
 • थालीपिठं बनवन्यासाठी थोडे तेल
 • एक छोटा कांदा
Dudhi Bhopla Thalipeeth Recipe In Marathi
Dudhi Bhopla Thalipeeth Recipe In Marathi

दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवण्याची कृती | Dudhi Bhopla Thalipeeth Making Process In Marathi

सर्वप्रथम आपण १ वाटी गहू पीठ, १ वाटी बाजरी पीठ, १ वाटी ज्वारी पीठ, २ चमचे बेसन पीठ, २ चमचे रवा, १ चमचा शेंगदाण्याचा कूट हे सर्व एकत्र घेऊ त्यानंतर आपण त्यात एक छोटा कांदा बारीक चिरून टाकू. त्यानंतर, आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट टाकू तसेच कोथिंबीर टाकू व मीठ चवीनुसार टाकूया.

सगळ्यात शेवटी दुधी भोपळा धुवून किसून आपण त्या वरील मिश्रणात टाकूया आणि हे सर्व मळून घेऊ हे पीठ थोडे सैलसरच मळावे गरजेनुसार पाणी टाकावे व पीठ सैलसर मळावे.

नंतर गॅस वर तवा  ठेवावा व थोडे तेल पूर्ण तव्यावर पसरावे नंतर पाणी हाताला लावून थालीपीठ मिश्रणाचा गोळा घेऊन तो तव्यावर थापावा दोन्ही बाजूने ते लालसर होईपर्यंत शेकावे ,आपण ते रुमाल ओला करून त्यावर थालीपीठ मिश्रणाचा गोळा घेऊन तो थापून मग तव्यावर थालीपीठ असणारी बाजू तव्यावर टाकावी व अलगद रुमाल दोन्ही हातांनी काढून घेऊ .

आपण हे थालीपीठ दही ,रायता ,लोणचे यासोबत खाऊ शकतो .

Leave a Comment