माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध | Diwali Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण दिवाळी / दिपावली या सणावर निबंध (Diwali Essay In Marathi) पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूयात.

दिवाळी (दिपावली) निबंध | Diwali Essay In Marathi

भारतात अनेक प्रकारचे सण साजरे केले जातात. त्यापैकी दिवाळी (दिपावली) या सणाला विशेष महत्व आहे. दिवाळी हा सण प्रत्येकालाच आवडतो. दिवाळीत संपूर्ण रोषणाई असते. तसेच लोक आपल्या घरापुढे कंदील लावतात आणि दिव्यांची आरास करतात. त्यामुळे सर्वत्र झगमगाट असतो. दिवाळीत घरापुढे रांगोळ्या काढल्या जातात तसेच लहान मुले लहान-लहान किल्ले बनवतात. या दिवसात नवीन कपडे आणि दाग-दागिन्यांची खरेदी सुद्धा केली जाते. लहान मुले फटाके उडवून आपला आनंद साजरा करतात. या दिवसात चिवडा,लाडू,करंजी,बर्फी,शेव,अनारसे,चकलीअसे फराळाचे अनेक प्रकार केले जातात आणि ते एकमेकांना आवडीने वाटले जातात. तसेच, लोक परस्परांना भेट वस्तू,शुभेच्छा संदेश पाठवतात आणि दिवाळीच्या शुभेच्छा देतात.

अश्विन द्वादशी/अश्विन त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे पाच- सहा दिवस दिवाळी साजरी केली जाते. वसुबारस, धनत्रयोदशी,नरक चतुर्दशी,लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज.वसुबारस वसुबारस या दिवशी गोमाता म्हणजेच गायीची पूजा केली जाते. गायी विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गायीची पूजा केली जाते. धनत्रयोदशीला धनाची पूजा केली जाते. खरे धन म्हणजे आरोग्य. म्हणून धन्वंतरी देवाला देखील पुजले जाते. नरक चतुर्दशी या दिवशी श्रीकृष्णांनी नरकासुर या राक्षसाचा वध केला असे म्हंटले जाते. तसेच या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान केले जाते.लक्ष्मीपूजन या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी घरातील सर्व सोन – चांदी, पैसे यांची पूजा केली जाते. लोक या दिवशी केरसुणी हिची सुद्धा पूजा करतात. दिवाळी पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. ह्या दिवशी नवे उद्योग / व्यवसाय सुरु केले जातात. तसेच या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस असतो. या दिवशी बहीण भावाला ओवाळते.

दिवाळी साजरी करण्यामागे अजून एक कथा सांगितली जाते. प्रभू श्रीराम हे १४ वर्षे वनवास करून याच दिवशी अयोध्येत परतले होते. या दिवशी अयोध्यावासियांनी त्यांचे दिवे लावून स्वागत केले होते. त्यामुळे, हीच प्रथा आज सुद्धा पाळली जाते.

दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण होते. दिवाळीच्या या सणात घरातील सर्व व्यक्ती एकत्र येतात आणि हा सण आनंदात साजरा करतात. त्यामुळे, दिवाळी हा सण प्रत्येकालाच आवडतो.

Diwali Essay In Marathi

हे पण वाचा :

महात्मा गांधी निबंध

Leave a Comment