Site icon देवनागरी मराठी

दिशा किती व कोणत्या? | Directions In Marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण दिशा म्हणजेच Directions In Marathi / 10 Directions In Marathi अभ्यासणार आहोत. दिशा किती व कोणत्या ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तसेच Directions Marathi to English names अर्थात सर्व दिशांना इंग्रजी मध्ये काय म्हणतात हे देखील पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूयात…

मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल दिशा माहित करण्यासाठी कंपास ( Compass ) म्हणजेच होकायंत्र वापरले जाते. आजच्या काळात, जरी तुमच्याकडे होकायंत्र नसले तरी तुम्ही मोबाईल च्या मदतीने सुद्धा दिशा माहित करून घेऊ शकतात.

जर तुम्हाला दिशा सहजपणे लक्षात ठेवायची असेल तर त्या तुम्ही अशाप्रकारे लक्षात ठेऊ शकतात. सूर्य ज्या दिशेने उगवतो ती पूर्व दिशा. पूर्वेच्या विरुद्ध दिशा पश्चिम दिशा. जर तुम्ही पूर्व दिशेला मुख करून उभे असाल तर तुमच्या उजव्या बाजूस दक्षिण दिशा असेल आणि डाव्या बाजूस उत्तर दिशा असेल.

Directions in marathi

४ दिशानिर्देशांची नावे | 4 Directions In Marathi

पूर्व दिशा | East Direction In Marathi :

सूर्य या दिशेने उगवतो. पूर्व दिशेलाच इंग्रजीमध्ये East म्हणतात.

पश्चिम दिशा | West Direction In Marathi :

पूर्वेच्या विरुद्ध दिशा पश्चिम दिशा येते. या दिशेला इंग्रजीमध्ये West म्हणतात.

दक्षिण दिशा | South Direction In Marathi :

जर तुम्ही पूर्व दिशेला मुख करून उभे असाल तर तुमच्या उजव्या बाजूस दक्षिण दिशा येते. दक्षिण दिशेलाच इंग्रजीमध्ये South म्हणतात.

उत्तर दिशा | North Direction In Marathi :

जर तुम्ही पूर्व दिशेला मुख करून उभे असाल तर तुमच्या डाव्या बाजूस उत्तर दिशा असेल. या दिशेलाच इंग्रजीमध्ये North म्हणतात.

८ दिशानिर्देशांची नावे | 8 Directions In Marathi

मित्रांनो, पूर्व-पश्चिम आणि दक्षिण-उत्तर या मुख्य दिशा सोडल्या तर ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य या आणखी दिशा मानल्या जातात. आपण मुख्य ४ दिशांची माहिती वर पाहिली. आता आपण उरलेल्या ४ दिशांची माहिती घेऊ.

ईशान्य दिशा | North-East Direction In Marathi :

ईशान्य दिशा हि उत्तर आणि पूर्व दिशेच्या मध्ये येते. या दिशेस इंग्रजीमध्ये North-East असे म्हणतात.

आग्नेय दिशा | South-East Direction In Marathi :

आग्नेय दिशा हि दक्षिण आणि पूर्व दिशेच्या मध्ये येते. या दिशेस इंग्रजीमध्ये South-East असे म्हणतात.

नैऋत्य दिशा | South-West Direction In Marathi :

नैऋत्य दिशा हि दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या मध्ये येते. या दिशेस इंग्रजीमध्ये South-West असे म्हणतात.

वायव्य दिशा | North-West Direction In Marathi :

वायव्य दिशा हि उत्तर आणि पश्चिम दिशेच्या मध्ये येते. या दिशेस इंग्रजीमध्ये North-West असे म्हणतात.

१० दिशानिर्देशांची नावे | 10 Directions In Marathi

मित्रांनो, आपण वरील उताऱ्यात पूर्व,पश्चिम,दक्षिण,उत्तर या मुख्य दिशा आणि ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य या दिशांची माहिती बघितली. आता आपण उरलेल्या २ दिशांची माहिती घेऊ.

आकाश दिशा :

वरची दिशा म्हणजेच आकाश दिशा.

पाताळ दिशा :

खालची दिशा म्हणजेच पाताळ दिशा.

मित्रांनो, अशा प्रकारे आपण १० दिशा कोणत्या आणि त्यांना इंग्रजीमध्ये (Directions In Marathi) काय म्हणतात हे सविस्तरपणे पाहिले. मित्रांनो, वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशेचे महत्व सांगितले गेले आहे.तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद !

हे पण वाचा :

१ ते १०० मराठी अंक । 1 ते 100 Marathi Ank

दिशा किती व कोणत्या?

एकूण दिशा १० असतात. त्या खालीलप्रमाणे :

पूर्व दिशा
पश्चिम दिशा
दक्षिण दिशा
उत्तर दिशा
ईशान्य दिशा
आग्नेय दिशा
नैऋत्य दिशा
वायव्य दिशा
आकाश दिशा
पाताळ दिशा

Exit mobile version