Site icon देवनागरी मराठी

कुरकुरीत कांद्याची भजी रेसिपी | Crispy Kanda Bhaji Recipe In Marathi

Crispy Kanda Bhaji Recipe In Marathi

Crispy Kanda Bhaji Recipe In Marathi

नमस्कार मित्रांनो,आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत कांद्याची भजी बनवण्याची रेसिपी – Crispy Kanda Bhaji Recipe In Marathi मराठीतून. माघील रेसिपी लेखात आपण कुरकुरीत भजी कशी करावी ते पाहिले या लेखात आपण कुरकुरीत कांद्याची भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – Crispy Kanda Bhaji Ingredients In Marathi आणि कुरकुरीत कांद्याची भजी बनवण्याची कृती – Crispy Kanda Bhaji Making Process In Marathi हे सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूयात.

कुरकुरीत कांद्याची भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य | Crispy Kanda Bhaji Ingredients In Marathi

कुरकुरीत कांद्याची भजी बनवण्याची कृती | Crispy Kanda Bhaji Making Process In Marathi

सर्वप्रथम आपण बेसन पीठ १ वाटी घेऊ त्यात पाव चमचा ओवा टाकूया ओवा टाकताना तो हाताने चोळून घेऊ त्यामुळे ओव्याचा स्वाद भजींना छान येतो नंतर त्यात चवीनुसार लाल मिरची १ चमचा, हळद अर्धा चमचा व मीठ टाकूया व कोथींबीर पण टाकूया हे मिश्रण आपण करून ठेऊ पाणी टाकू नये कोरडेच ठेवावे.

नंतर २ कांदे उभे चिरून घेऊ व त्याला अगदी थोडेसे मीठ लावून ५ मिनिटे ठेऊ व नंतर कांद्याला वरील मिश्रणात टाकू व मिक्स करून घेऊ यात आपण पाणी टाकत नाही कारण कांद्याला मीठ लावलेले असल्याने त्याला पाणी सुटते म्हणून ही भजी बनवताना पाण्याची गरज लागत नाही. नंतर सगळ्यात शेवटी खाण्याचा सोडा पाव चमचा टाकून घेऊ व मिश्रण एका दिशेने १० मिनिटे कालवून घेऊ.

आता कढईत तेल तापत ठेऊ गॅस मध्यम आचेवर ठेऊ व तेल तापले कि त्यात वरील मिश्रण हाताने सुटसुटीत टाकू व भजी तळून घेऊ. भजी आपण चिंचेची चटणी किंवा पुदिन्याची चटणी यासोबत खाऊ शकतो.

Exit mobile version