कुरकुरीत बटाटा भजी रेसिपी | Crispy Batata Bhaji Recipe In Marathi

नमस्कार मित्रांनो,आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत बटाटा भजी बनवण्याची रेसिपी – Crispy Batata Bhaji Recipe In Marathi मराठीतून. माघील रेसिपी लेखात आपण कुरकुरीत कांद्याची भजी कशी करावी ते पाहिले या लेखात आपण कुरकुरीत बटाटा भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – Crispy Batata Bhaji Ingredients In Marathi आणि कुरकुरीत बटाटा भजी बनवण्याची कृती – Crispy Batata Bhaji Making Process In Marathi हे सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूयात.

कुरकुरीत बटाटा भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य | Crispy Batata Bhaji Ingredients In Marathi

  • बेसन पीठ १ वाटी
  • बटाटे २
  • लाल मिरची १ चमचा
  • हळद अर्धा चमचा
  • ओवा पाव चमचा
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर
  • खाण्याचा सोडा पाव चमचा
  • तळण्यासाठी तेल

कुरकुरीत बटाटा भजी बनवण्याची कृती | Crispy Batata Bhaji Making Process In Marathi

सर्वप्रथम आपण बेसन पीठ १ वाटी घेऊ त्यात पाव चमचा ओवा टाकूया ओवा टाकताना तो हाताने चोळून घेऊ त्यामुळे ओव्याचा स्वाद भजींना छान येतो नंतर त्यात चवीनुसार लाल मिरची १ चमचा ,हळद अर्धा चमचा व मीठ टाकूया व कोथींबीर पण टाकूया नंतर हे मिश्रण आपण पाणी टाकून मिक्स करून घेऊ. नंतर सगळ्यात शेवटी खाण्याचा सोडा पाव चमचा टाकून घेऊ व मिश्रण एका दिशेने १० मिनिटे कालवून घेऊ. नंतर २ बटाटे धुवून साल काढून घेऊ व गोल आकारात पातळ कापून घेऊ.

आता कढईत तेल तापत ठेऊ गॅस मध्यम आचेवर ठेऊ व तेल तापले कि एक एक बटाट्याचे काप घेऊ व वरील मिश्रणात बुडवून तेलात टाकू व तळून घेऊ. ही भजी आपण चिंचेची चटणी किंवा पुदिन्याची चटणी यासोबत खाऊ शकतो .

Leave a Comment