परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल मित्राचे अभिनंदन करणारे पत्र | Congratulatory Letter to a Friend for Passing the Exam

मित्रांनो, पत्राचे प्रकार किती व कोणते? हे आपण माघील एका ब्लॉग मध्ये पाहिले.आज आपण पाहुयात परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल मित्राचे अभिनंदन करणारे पत्र.

परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल मित्राचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

प्रति,

[ व्यक्तीचे नाव (ज्याला पत्र लिहितो आहे ) ]
[ व्यक्तीचा घरचा पत्ता ]
[ दिनांक ]

प्रिय मित्र [ मित्राचे नाव ],

अभिनंदन !अभिनंदन !!अभिनंदन !!! दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल तुझे जितके कौतुक करू तितके ते कमीच !

मला आजच काकांकडून तुझ्या यशाबद्दल समजले आणि क्षणार्धात मला आपल्या बालपणीचे दिवस आठवले. तुझ्या यशात काका आणि काकूंचा तसेच तुझ्या गुरूंचा वाटा आहे हे विसरू नकोस. तू एक दिवस नक्की प्रगती करशील आणि तुझं वकील बनण्याचं स्वप्न लवकर पूर्ण करशील याची मला खात्री आहे. अशीच प्रगती करत रहा आणि येणाऱ्या प्रत्येक परीक्षेत यशस्वी होत रहा. पुन्हा एकदा तुला खूप खूप शुभेच्छा. लवकरच भेटू.

तुझा प्रिय मित्र,
[ तुमचे नाव ]

Leave a Comment