Christmas essay in marathi | Short essay on christmas in marathi | नाताळ निबंध

ख्रिसमस म्हणजेच नाताळ हा सण दरवर्षी २५ डिसेंम्बर ला साजरा केला जातो. ख्रिसमस हा सण ख्रिश्चन धर्मियांचा प्रमुख सण मानला जातो.

२५ डिसेंम्बर रोजी प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला.प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्म बेथेलहेम येथे मेरी यांच्या पोटी झाला. मेरी ला गेब्रिअल नावाच्या देवदूताने सांगितले की तुझ्या पोटी प्रभू येशू ख्रिस्त जन्म घेणार आहेत. त्यामुळेच लोक प्रभू येशू यांना देवाचा अवतार मानतात.

ख्रिसमस हा सण जरी २५ डिसेंम्बर ला असला तरी जवळपास २-३ आठवडे हा सण साजरा केला जातो.या दरम्यान ख्रिश्चन बहुसंख्य देशात सुट्टी असते आणि सर्व लोक आनंदाने हा सण साजरा करतात.या दरम्यान लोक आपल्या घरांना सजवतात तसेच चर्च सुध्दा सजवले जाते.नाताळ च्या आधल्या दिवशी सांताक्लॉज लहान मुलांना विविध प्रकारचे गिफ्ट्स आणि चॉकलेट देतो.म्हणूनच सांताक्लॉज हा लहान मुलांना खुप आवडतो.तसेच या दिवशी ख्रिश्चन धर्मीय लोक घराच्या अंगणात ख्रिसमस ट्री लावतात आणि ती सजवतात. या ट्री च्या वरच्या बाजूस स्टार लावला जातो जो की बेथेलहेम ताऱ्याचा प्रतिक मानला जातो. याच ट्री च्या माध्यमातून लोक एकमेकांना भेटवस्तू देतात.

अशाप्रकारे २५ डिसेंम्बर रोजी नाताळ हा सण संपूर्ण जगात उत्साहात साजरा केला जातो.

Leave a Comment