बातमी लेखन । Batmi Lekhan In Marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण बातमी लेखन ( Batmi Lekhan In Marathi ) बातमी लेखन म्हणजे काय ? What is Batmi lekhan in marathi ? , बातमी लेखनाचे स्वरूप कसे असावे ? Batmi Lekhan Format In Marathi, बातमी लेखन कसे करावे ? How to write batmi lekhan In Marathi आणि बातमी लेखन उदाहरणे | Batmi Lekhan Examples In Marathi हे सविस्तरपणे पाहणार आहोत.

मित्रांनो, जर तुम्ही शाळेत असाल तर बातमी लेखनावर ( Batmi Lekhan In Marathi ) अनेकदा प्रश्न विचारले जातात. तुम्हाला खाली दिलेली माहिती नक्कीच उपयोगी पडेल.

चला तर मग सुरु करूयात…

बातमी लेखन म्हणजे काय | What is Batmi lekhan in marathi

Batmi Lekhan In Marathi
Batmi Lekhan In Marathi

मित्रांनो, अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ज्या बातम्या तुम्ही वृत्तपत्रात वाचतात त्यांनाच बातमी लेखन असे म्हणतात. बातम्या म्हणजे आपल्या सभोवताली ज्या घडामोडी घडत असतात त्या सर्व गोष्टी तुम्हाला बातमी स्वरूपात भेटतात. याच बातम्या अगदी मोजक्या शब्दांत मांडणे यालाच बातमी लेखन असे म्हणतात.

मित्रांनो, आजकालच्या युगात आपण डिजिटल स्वरूपात सुद्धा बातम्या वाचू शकतो. सध्या जवळपास सर्वच वृत्तपत्रांचे ईपेपर उपलब्ध आहेत. हे ईपेपर आपण संगणकावर किंवा मोबाईलवर सहजपणे वाचू शकतो.

कोणतीही माहिती देणे,सखोल ज्ञान देणे तसेच समाजाला जागरूक ठेवणे या गोष्टी बातमी लेखनातून साध्य होत असतात.

बातमी लेखनाचे स्वरूप कसे असावे ? | Batmi Lekhan Format In Marathi

मित्रांनो, साधारणपणे बातमीचे स्वरूप हे खालील प्रमाणे असावे.

  • बातमीचे शीर्षक । News Headline

मित्रांनो, कोणतीही बातमी लिहिताना त्या बातमीचे शीर्षक म्हणजेच संपूर्ण बातमीचा आरसा असतो. कोणतीही बातमी वाचताना ही बातमी कशा संदर्भात आहे याची कल्पना येते. म्हणूनच, सुरवातीला लिहिले जाणारे शीर्षक हे महत्वाचे ठरते.

  • बातमीचा स्रोत | News Source

बातमीचा स्रोत म्हणजेच बातमी नक्की कोणी दिली याची माहिती या भागात सांगितली जाते. शीर्षकानंतर लगेचच बातमीचा स्रोत सांगणे अपेक्षित असते.

  • दिनांक आणि स्थळ | Data & Place

दिलेली बातमी ही साधारपणे कधी घडली आहे तसेच कोणत्या वेळी घडून गेली आहे याची माहिती आणि कोणत्या ठिकाणी घडली या संबंधित तपशील बातमी लेखनात असावा. त्यामुळेच, दिनांक आणि स्थळ हे कोणत्याही बातमीत महत्वाचे ठरते.

  • मुख्य बातमी आणि त्याचा तपशील | Main News & Details

मुख्य बातमी म्हणजेच बातमीच्या सुरवातीला संबंधित बातमीचा महत्वाचा मुद्दा येणे अपेक्षित असते. म्हणजेच, दिलेली बातमी नक्की कोणत्या संदर्भात आहे त्याचा उल्लेख असावा.

बातमीचा तपशील अर्थात बातमीचा उर्वरित तपशील हा तुम्हाला मुख्य बातमी नंतर लिहावा लागतो. साधारणपणे, बातमीचे स्पष्टीकरण येथे दिले जाते.

बातमी लेखन कसे करावे ? | How to write batmi lekhan

जर तुम्ही बातमी लेखन करत असाल तर बातमी लेखन कसे करावे हे तुम्हाला माहित असणे महत्वाचे आहे. कोणतीही बातमी लिहिताना खालील गोष्टी विचारात घ्याव्यात.

  • कोणतीही बातमी लिहिताना ती बातमी अचूक आहे याची खातरजमा करावी.
  • घटनेचा योग्य तपशील देण्यात यावा.
  • स्वतः च्या मनाने कोणतीही अधिक माहिती समाविष्ट करू नये.
  • कोणाच्याही भावना दुखावतील अशी वाक्यरचना असू नये.
  • कोणतीही बातमी ही नेहमी भूतकाळात लिहिली जावी.

बातमी लेखन उदाहरण | Batmi Lekhan Example In Marathi

आदर्श विद्या मंदिर बीड येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

बीड : दिनांक ५ सप्टेंबर (प्रतिनिधी)

बीड येथील आदर्श विद्या मंदिर शाळेमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात पार पडला.या दिवशी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. वसंत पाटील हे होते.

या शाळेतील विद्यार्थ्यांनी कार्यक्रम उत्तम आखला होता. काही विद्यार्थ्यांनी काही विषयांचे पाठ स्वतः घेतले. तसेच काही विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त भाषण सुद्धा दिले.या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे अध्यक्षांनी केलेले भाषण. आदर्श शिक्षक कसा असावा याचे मार्गदर्शन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.

Leave a Comment