Application to close bank account in marathi | बँक खाते बंद करण्याकरिता बँक व्यवस्थापकास अर्ज

नमस्कार मित्रांनो, आज आपण बँक खाते बंद करण्याकरिता बँक व्यवस्थापकास अर्ज कसा लिहावा (Application to close bank account in marathi) ते पाहणार आहोत. जर तुम्हाला तुमचे बँक खाते कायमचे बंद करावयाचे असल्यास तुम्हाला बँकेत एक अर्ज द्यावा लागतो. तसेच तुमचे चेक बुक आणि ATM कार्ड सुद्धा जमा करावे लागते. तुमच्या खात्यातील उर्वरित रक्कम तुम्हाला लगेच कॅश स्वरूपात मिळते. चला तर मग पाहुयात ह्या अर्जाचा format कसा असावा.

बँक खाते बंद करण्याकरिता बँक व्यवस्थापकास अर्ज लिहा

[ बँक व्यवस्थापक ],
[ बँक कार्यालय पत्ता ]
[ दिनांक ]

विषय : बँक खाते बंद करण्याकरिता अर्ज

महोदय,

नमस्कार, सदर अर्जातून मी [ तुमचे नाव ] आपणांस सांगू इच्छितो की माझे बचत खाते या बँकेत आहे. माझा अकाउंट नंबर (Account Number) [तुमचा खाते क्रमांक] हा आहे. मी काही कारणास्तव हे खाते सुरु ठेवू इच्छित नाही त्यामुळे मी आपणास विनंती करतो कि लवकरात लवकर माझे बचत खाते बंद करावे आणि माझ्या खात्यातील उर्वरित रक्कम मला सुपूर्द करावी.

अर्जासोबत माझे चेक बुक आणि ATM कार्ड जोडत आहे.

धन्यवाद !

आपला विश्वासू,
[ तुमचे नाव ]
[ तुमचा पत्ता ]
[ तुमची सही ]

Leave a Comment