आप्पे रेसिपी | Aappe Recipe In Marathi

नमस्कार मित्रांनो,आज आपण पाहणार आहोत आप्पे बनवण्याची रेसिपी – Aappe Recipe In Marathi मराठीतून. माघील रेसिपी लेखात आपण पुरणपोळी कशी करावी ते पाहिले या लेखात आपण आप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य – Aappe Ingredients In Marathi आणि आप्पे बनवण्याची कृती – Aappe Making Process In Marathi हे सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूयात.

आप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य –  Aappe Ingredients In Marathi

 • दोन वाटी तांदूळ
 • एक चमचा चणा डाळ
 • एक वाटी उडीद डाळ
 • हिरवी मिर्ची बारिक चिरलेली
 • कांदा
 • टमाटर
 • कोथिंबीर
 • कढीपत्ता
 • जिरे
 • मोहरी
 • मीठ
 • तेल
 • खायचा सोडा

आप्पे बनवण्याची कृती – Aappe Making Process In Marathi

सकाळी आपण तांदूळ, चणा डाळ व उडीद डाळ पाण्याने धुऊन घेऊ व ते पाणी टाकून भिजवून ठेवू.आठ तासानंतर डाळी आणि तांदूळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ व ते पुन्हा आठ तास तसेच ठेवू. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा,एक बारीक चिरलेला टमाटर ,बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ व खायचा सोडा टाकून घेऊ व हे मिश्रण चांगले हलवून घेऊ.एका छोट्या कढईत तेल घेवून त्यात जिरे, मोहरी, कडीपत्ता याची फोडणी करु व ते मिश्रणात टाकू.

आता गॅसवर आप्पे पात्र ठेवून त्यात तेल टाकून घेऊया व चमच्याने हे मिश्रण टाकून घेऊ त्यावर झाकण ठेवू व बारीक गॅसवर त्याला शिजवून घेऊन आणि पाच मिनिटांनी झाकण काढून घेऊ व आप्पे उलटून घेऊ त्यात पुन्हा तेल टाकून घेऊ व पुन्हा त्यावर झाकण ५ मिनिट ठेवू. आता झाकण काढून आप्पे काढून घेऊ.आप्पे आपले खाण्यासाठी तयार आहे. हे आपण नारळाची चटणी व सांबर सोबत खाऊ शकतो.

Leave a Comment