७/१२ उतारा कसा काढावा । ७/१२ उतारा ऑनलाईन कसा शोधायचा । 7/12 Utara online in marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ७/१२ उतारा कसा काढावा किंवा ७/१२ उतारा ऑनलाईन कसा शोधायचा (7/12 Utara online in marathi).मित्रांनो, जर तुम्हाला ७/१२ उतारा पाहायचा असेल किंवा ८अ पाहायचा असेल तर तुम्ही तो ऑनलाईन सुद्धा बघू शकता. या लेखात आपण अगदी सोप्या भाषेत हेच समजून घेणार आहोत की ७/१२ उतारा ऑनलाईन कसा पाहायचा.

मित्रांनो, ७/१२ किंवा ८अ पाहण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक वेबसाईट सुरु केली आहे. जी वापरून तुम्ही अगदी सहजपणे ७/१२ किंवा ८अ पाहू शकता.

महाराष्ट्र भूमिलेख ही एक वेबसाईट असल्यामुळे तुम्ही ती तुमच्या संगणकावर किंवा मोबाईलवर सुद्धा पाहू शकता आणि घरबसल्या ७/१२ किंवा ८अ पाहू शकता. तुम्ही महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात राहत असाल तरी तुम्ही तो पाहू शकता. तुम्ही हे उतारे नुसते पाहू शकत नाही तर डाउनलोड सुद्धा करू शकता तेही अगदी मोफत.

मित्रांनो , या लेखात आपण ७/१२ उतारा म्हणजे काय ? ८अ उतारा म्हणजे काय ? महाराष्ट्र भूमिलेख ही वेबसाईट नक्की कशी ओपन करायची ? या वेबसाईट वरून ७/१२ किंवा ८अ कसा पाहायचा ? हे उतारे कसे डाउनलोड करायचे हे सर्व मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. तर मित्रांनो, नक्की हा लेख तुम्ही संपूर्ण वाचा आणि खाली दिलेल्या स्टेप्स वापरा.

चला तर मग पाहुयात ऑनलाईन ७/१२ कसा शोधायचा ते…

७/१२ उतारा म्हणजे काय ? | What is Satbara Utara In Marathi

मित्रांनो, ७/१२ उताऱ्यामध्ये दोन प्रकारचे फॉर्म्स असतात. फॉर्म ७ आणि फॉर्म १२.

फॉर्म ७ मध्ये जमीन मालकाची माहिती आणि फॉर्म १२ मध्ये जमिनीविषयी माहिती असते.

या उताऱ्यावरून जमीनधारकाकडे किती जमीन आहे याची माहिती मिळते.

८ अ उतारा म्हणजे काय ? | What is Aath a Utara In Marathi

मित्रांनो, एका व्यक्तीच्या नावे त्या गावात किती जमीन आहे याची माहिती या उताऱ्यातून भेटते. या उताऱ्यातून एखाद्या व्यक्तीच्या नावे किती जमीन आहे याची माहिती भेटू शकते.

७/१२ उतारा ऑनलाईन कसा काढावा | 7/12 Utara online in marathi

मित्रांनो, ७/१२ काढण्यासाठी खालील स्टेप्स वापरा.

१. तुमचा वेब ब्रॉव्हजर ओपन करा ( Chrome, Opera Mini ) आणि https://bhulekh.mahabhumi.gov.in/ ही वेबसाईट उघडा. तुम्हाला खालील प्रमाणे वेबसाईट दिसेल.

7/12 Utara online in marathi
7/12 Utara online in marathi

२. तुमचा विभाग निवडा. जर तुमचा विभाग जाणून घ्यायचा असेल तर खालील मॅप बघा.जेणेकरून तुमचा जिल्हा कोणत्या विभागात मोडतो हे समजेल.

2

३. विभाग निवडून झाल्यावर Go या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला खालील पेज ओपन झालेले दिसेल.

3

४. तुमचा जिल्हा निवडा. त्यानंतर तालुका आणि गाव निवडा. तुम्हाला खालील प्रमाणे पेज दिसेल.

4

५. त्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. म्हणजेच, जर खालील पैकी कोणताही एक पर्याय वापरून तुम्ही ७/१२ शोधू शकतात. . अधिक माहितीसाठी खाली दिलेली इमेज पाहा.

शोध :

  • सर्वे नंबर / गट नंबर
  • अक्षरी सर्वे नंबर / गट नंबर
  • पहिले नाव
  • मधील नाव
  • आडनाव
  • संपूर्ण नाव
5

६. वरीलपैकी एका पर्यायावर क्लिक करा मग तुम्हाला माहिती लिहिण्यासाठी बॉक्स दिसेल. माहिती लिहून झाली की शोधा या बटनावर क्लिक करा. अधिक माहितीसाठी खाली दिलेली इमेज पाहा.

७. खाली ड्रॉपडाउन मध्ये तुमचे नाव शोधा आणि नोंदणीसाठी तुमचा मोबाईल क्रमांक टाका. त्यांनतर तुम्हाला तुमचा सातबारा दिसेल. तो तुम्ही pdf स्वरूपात डाउनलोड सुद्धा करू शकतात.

अशाप्रकारे, तुम्ही ७/१२ शोधू शकता आणि डाउनलोड करू शकता.मित्रांनो, जर तुम्हाला ७/१२ उतारा काढताना काही अडचण येत असेल तर तुम्ही खाली कमेंट करून मला विचारू शकता.

1. ७/१२ उतारा म्हणजे काय ? | What is Satbara Utara In Marathi

७/१२ उताऱ्यामध्ये दोन प्रकारचे फॉर्म्स असतात. फॉर्म ७ आणि फॉर्म १२.
फॉर्म ७ मध्ये जमीन मालकाची माहिती आणि फॉर्म १२ मध्ये जमिनीविषयी माहिती असते.
या उताऱ्यावरून जमीनधारकाकडे किती जमीन आहे याची माहिती मिळते.

2. ८ अ उतारा म्हणजे काय ? | What is Aath a Utara In Marathi

एका व्यक्तीच्या नावे त्या गावात किती जमीन आहे याची माहिती या उताऱ्यातून भेटते. या उताऱ्यातून एखाद्या व्यक्तीच्या नावे किती जमीन आहे याची माहिती भेटू शकते.

Leave a Comment