15 Keyboard Shortcut Keys In Marathi | १५ मराठी किबोर्ड शॉर्टकट कीज

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत १५ शॉर्टकट कीज ज्या संगणक किबोर्डसाठी वापरल्या जातात. (15 Keyboard Shortcut Keys In Marathi) जर तुम्ही दररोज संगणक वापरत असाल तर तुम्हाला नक्कीच या शॉर्टकट कीज खूपच उपयोगी ठरतील. या कीज चा उपयोग करून तुम्ही तुमचे संगणकीय काम लवकर करू शकतात. चला तर मग पाहुयात कोणत्या आहेत त्या शॉर्टकट कीज ज्या वापरून तुम्ही तुमचे काम लवकर करू शकता.

15 Keyboard Shortcut Keys In Marathi

15 Keyboard Shortcut Keys In Marathi
15 Keyboard Shortcut Keys In Marathi
 • Window + L

जर तुम्ही private company (खाजगी कंपनी) मध्ये काम करत असाल तेव्हा अनेक वेळा तुम्हाला तुमच्या जागेवरून उठून जावे लागते. अशावेळी तुमच्या कॉम्प्युटरवरील काम कोणी पाहू नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तो लॉक करू शकता. यासाठी तुम्ही Window + L ही Key वापरू शकता.

 • Window + D

जर तुम्हाला डेस्कटॉप (Desktop) वर जायचे असेल तर तुम्ही Window + D या key चा वापर करू शकता.

 • Esc Key

जर तुम्ही चुकून अशा पेज वर आहात जिथे तुम्हाला बॅक (Back ) म्हणजेच माघे जाण्यासाठी पर्याय नसेल तर अशावेळी तुम्ही Esc key वापरू शकता.

 • Ctrl + F

चालू पेज मध्ये जर तुम्हाला कोणताही शब्द शोधायचा असेल तर तुम्ही Ctrl+F ही Key वापरू शकता. जेव्हा तुम्ही Ctrl+F ही Key वापरता तेव्हा तुम्हाला एक इनपुट बॉक्स (Input box) दिसेल. तिथे तुम्ही तुम्हाला शोधायचा आहे तो शब्द टाकू शकता.

 • Ctrl + A

चालू पेज मधील सर्व माहिती सिलेक्ट करण्यासाठी Ctrl + A या Key चा उपयोग केला जातो.

 • Ctrl + C

चालू पेज मधील सिलेक्ट (Select) केलेली माहिती कॉपी (Copy) करण्यासाठी Ctrl + C या Key चा उपयोग केला जातो.

 • Ctrl + V

चालू पेज मध्ये कॉपी (Copy) केलेली माहिती पेस्ट (Paste) करण्यासाठी Ctrl + V या Key चा उपयोग केला जातो.

 • Ctrl + X

चालू पेज मधील सिलेक्ट (Select) केलेली माहिती कट करण्यासाठी Ctrl + X या Key चा उपयोग केला जातो.

 • Ctrl + I

चालू पेज मधील सिलेक्टेड (Selected ) डेटा इटालिक (Italic) करण्यासाठी Ctrl + I या Key चा उपयोग केला जातो.

 • Ctrl + U

चालू पेज मधील सिलेक्टेड (Selected ) डेटा अधोरेखित किंवा अंडरलाईन (Underline) करण्यासाठी Ctrl + U या Key चा उपयोग केला जातो.

 • Ctrl + B

चालू पेज मधील सिलेक्टेड (Selected ) डेटा बोल्ड (Bold) करण्यासाठी Ctrl + B या Key चा उपयोग केला जातो.

 • Ctrl + Z

Undo म्हणजेच जे काम तुम्ही नुकतेच केले असेल आणि तुम्हाला ते नको असेल तर जुने बदल परत आणण्यासाठी Ctrl + Z या Key चा उपयोग केला जातो.

 • Ctrl + Home

जर तुम्ही एखादा मजकूर वाचत असाल आणि तुम्हाला त्या मजकुराच्या पहिले म्हणजेच जिथून वाक्य start झाले तिथे पोहचायचे असेल तर अशावेळी तुम्ही Ctrl + Home या key चा वापर करू शकता.

 • Ctrl + End

जर तुम्ही एखादा मजकूर वाचत असाल आणि तुम्हाला त्या मजकुराच्या शेवटी जायचे असेल तर अशावेळी तुम्ही Ctrl + End या key चा वापर करू शकता.

 • Ctrl + S

जर तुम्हाला कोणतीही फाईल कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला फाईल (File) Option सिलेक्ट करून मग ती फाईल (File) सेव्ह करावी लागते परंतु जर तुम्ही Ctrl + S या key चा वापर केलात तर तुम्ही सहजपणे फाईल सेव्ह (save) करू शकता.

Leave a Comment