१५ ऑगस्ट भाषण | 15 August bhashan in marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण १५ ऑगस्ट भाषण ( 15 August bhashan in marathi ) म्हणजेच स्वतंत्र दिनावर भाषण – 15 August Speech in marathi कसे असावे हे पाहणार आहोत. मित्रांनो, १५ ऑगस्ट या दिवशी आपला म्हणजेच भारताचा स्वतंत्र दिन असल्याने प्रत्येक शाळा, कॉलेज तसेच सरकारी किंवा खाजगी कार्यालयात झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमात १५ ऑगस्ट या विषयावर भाषण 15 August bhashan in marathi देखील ठेवले जाते. जर तुम्हाला ही भाषण करण्याची संधी भेटली तर ते तुम्ही खाली दिलेल्या माहितीनुसार भाषण करू शकता.

15 August bhashan in marathi

व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक आणि येथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार!!! माझे नाव तुषार असून मी आज १५ ऑगस्ट या आपल्या स्वतंत्र दिनानिमित्त भाषण करणार आहे तरी आपण ते शांतपणे ऐकून घ्यावे ही विनंती.

सर्वप्रथम आपणास स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
मित्रांनो, १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपणास इंग्रजांपासून स्वतंत्र मिळाले. आज आपण या स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेऊ शकतो या माघे अनेक स्वतंत्र सैनिकांचे तसेच नेत्यांचे बलिदान आहे. या सर्वांची आठवण आपण या निमित्ताने काढली पाहिजे आणि त्यांचे उपकार मानले पाहिजेत. त्यांनी हे स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहिले आणि ते मिळवण्यासाठी अतोनात हाल सोसले. त्यांनी दिलेले हे स्वतंत्र आपण जपले पाहिजे आणि प्रत्येकाने भारताच्या प्रगतीत आपले योगदान दिले पाहिजे असं मला वाटत!

मित्रांनो, आज स्वतंत्र दिनानिमित्त अनेक ठिकाणी झेंडावंदनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच, अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात. या सर्वांमाघील भावना आपण स्वतंत्र सेनानी यांची आठवण काढून त्यांचे उपकार मानावे हेच असते.

मित्रांनो, विविधतेत एकता ही आपली ताकद आहे. भारतात अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहतात. आपण सर्वांनी भारताच्या प्रगतीत आणि भारतास एक महासत्ता बनवण्यास असेच योगदान द्यायचे आहे.

मित्रांनो, आज भारत सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे. भारत कृषिप्रधान देश असल्याने शेती ही भारताची ताकद आहे. तसेच, भारत इतर क्षेत्रात म्हणजेच उत्पादन, मेडिकल, शिक्षण या सर्वच ठिकाणी अग्रेसर आहे. आज अनेक नवनवीन स्टार्टअप सुरू होत आहेत आणि त्यापैकी अनेक उद्योग हे यश प्राप्त करत आहे ही देखील एक चांगली बाब आहे.

असाच भारत प्रगती करत राहो अशी आशा व्यक्त करतो आणि तुम्ही मला ही भाषण करण्याची संधी दिलीत त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद!!!

Leave a Comment